नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज जानेवारी-मार्च
“अनेकांच्या मते भरपूर पैसा असल्यास मनुष्य आनंदी होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला बायबलमधून, प्राचीन काळी लिहिलेले एक सत्य विधान वाचून दाखवू का? [घरमालकाने परवानगी दिल्यास १ तीमथ्य ६:९, १० वाचा.] पैशामुळे खरा आनंद मिळेलच असे नाही आणि भरपूर पैसा असणे हा देवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा नाही हे या नियतकालिकात स्पष्ट करण्यात आले आहे.”
टेहळणी बुरूज एप्रिल-जून
हे नियतकालिक ख्रिस्ती घरमालकांना आणि बायबलचा आदर करणाऱ्या लोकांना द्यावे. “इतिहासातील होऊन गेलेल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तीबद्दल विचारले असता अनेक जण येशूचे नाव घेतात. तुम्हालाही असेच वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] येशूबद्दलचे सत्य जाणून घेण्याकरता आपण, त्याच्याविषयी बोलल्या जाणाऱ्या उलटसुलट गोष्टींचे परीक्षण का केले पाहिजे ते पाहा. [योहान १७:३ वाचा.] येशू व त्याच्या शिकवणींबद्दल बायबल काय म्हणते त्याबद्दल टेहळणी बुरूज याच्या या खास अंकात माहिती दिली आहे.”