घरोघरचे प्रचारकार्य करताना चांगले साहाय्यक असा
१. सेवेत जोडीने कार्य केल्यामुळे कोणते फायदे होतात?
१ एके प्रसंगी येशूने त्याच्या ७० शिष्यांना प्रचारासाठी पाठवले व पाठवताना “दोघे दोघे असे . . . पाठविले.” (लूक १०:१) या व्यवस्थेमुळे त्याच्या शिष्यांना प्रचार करताना एकमेकांना मदत करण्याची व प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली असेल यात शंकाच नाही. इतर प्रचारकांसोबत सेवा करताना आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
२. आपला जोडीदार प्रस्तावना देत असतो तेव्हा त्याचे बोलणे आपण कसे व का ऐकले पाहिजे?
२ ऐकण्याद्वारे: तुमचा जोडीदार प्रस्तावना सादर करतो तेव्हा त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐका. (याको. १:१९) जर तो शास्त्रवचन वाचत असेल तर तुम्ही तुमच्या बायबलमध्ये पाहा. जो बोलत असतो, मग तो तुमचा जोडीदार असो वा घरमालक त्याच्याकडे पाहा. तुम्ही त्याच्या संभाषणाकडे लक्ष दिल्यास घरमालकही असे करण्यास प्रवृत्त होईल. संवेदनशील क्षेत्रात कार्य करत असताना सभोवार काय चालले आहे यावर नजर ठेवल्यास व निरीक्षण करत राहिल्यास, जर विरोधक जमा होत असतील तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सावध करू शकता व तुम्ही दोघे तेथून निघून जाऊ शकता.
३. आपण कधी बोललेले आपल्या जोडीदाराला आवडेल?
३ कधी बोलायचे ते ओळखणे: आपला जोडीदार प्रस्तावना देत असतो तेव्हा त्याला बोलू देण्याद्वारे आपण त्याला आदर दाखवत असतो. (रोम. १२:१०) आपण मधेमधे बोलू नये. जर आपला जोडीदार त्याला काय बोलायचे हे विसरून गेला किंवा घरमालकाने एखादा प्रश्न विचारला आणि आपला जोडीदार त्याचे उत्तर देण्यासाठी मदत मागतो तेव्हा दुसऱ्या विषयावर बोलणे सुरू करण्यापेक्षा, त्याच्याच बोलण्याला आपण पुढे धरून बोलावे. (नीति. १६:२३; उप. ३:१, ७) जर आपण बोलत असू तर आपले शब्दही साक्षकार्याला अनुरूप असे असले पाहिजे.—१ करिंथ. १४:८.
४. आपण सेवेत आनंदी व यशस्वी कसे होऊ शकतो?
४ शिष्यांच्या ३५ जोड्यांनी आपले प्रचारकार्य संपवले तेव्हा ते सर्व “आनंदाने परत” आले. (लूक १०:१७) आपल्या जोडीदाराबरोबर घरोघरचे प्रचारकार्य करताना ऐकण्याद्वारे व कोठे बोलायचे ते ठरवण्याद्वारे आपणही सेवेत आनंदी व यशस्वी होऊ शकतो.