मार्च ८ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च ८ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ४ परि. १२-२१, पृ. ४८ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल १-४
क्र. १: १ शमुवेल २:१८-२९
क्र. २: वैद्यकीय उपचाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे (fy पृ. १२४-१२६ परि. १९-२३)
क्र. ३: यहोवाचे मुलांवर प्रेम आहे हे शास्त्रवचनांतून दिसून येते
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. सावध राहा! मार्च २०१० इंग्रजी अंकातील पृष्ठ २२ वरील सर्प उपासनेबद्दलचा लेख कदाचित काही घरमालकांच्या भावना दुखावू शकतो. त्यामुळे हा अंक क्षेत्रात सादर करताना काळजी घेतली पाहिजे.
१० मि: प्रचार करताना तुमचा आवाज घरमालकाला स्पष्ट ऐकू येतो का? ईश्वरशासित सेवा प्रशाला (मार्गदर्शक पुस्तक) अभ्यास क्र. २३, परिच्छेद १-१२ वर आधारित भाषण.
२० मि: “देवाने दिलेल्या महान देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर तुमच्या मंडळीत स्मारकदिनाची खास आमंत्रणे देण्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा. आपले क्षेत्र संवेदनशील असल्यास, या मोहिमेदरम्यान आपण सांभाळून व खबरदारीने प्रचार केला पाहिजे. एक साहाय्यक पायनियर एका व्यक्तीला ती आस्थेवाईक आहे की नाही याची खातरी करून त्यानंतरच आमंत्रण देत आहे असे प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर त्याला विचारा की साहाय्यक पायनियरिंग करण्याकरता त्याने आपल्या जीवनात कोणत्या तडजोडी केल्या व त्यामुळे त्याला कोणता फायदा झाला.