फेब्रुवारी २२ च्या सप्ताहाचा आराखडा
फेब्रुवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ (१९१)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv परिशिष्ट पृ. २३७-२३९
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १९-२१
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
गीत १८ (१६२)
५ मि: घोषणा.
१५ मि: मार्च महिन्याची सादरता. दोन प्रचारकांची मुलाखत घ्या व महिन्यात सादर करणार असलेल्या साहित्याची कोणती वैशिष्ट्ये त्यांना उपयुक्त वाटतात व कोणती प्रस्तावना क्षेत्रात यशस्वी झाल्याचे त्यांना वाटते ते विचारा. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्यांच्या सादरतेचे प्रात्यक्षिक करून दाखवायला किंवा पुनर्भेट घेताना प्रकाशनाचा वापर करून बायबल अभ्यास कसा सुरू केला त्याचे नाट्य रूपांतर करून दाखवायला सांगा.
१५ मि: विद्यार्थ्यांचे लक्ष संघटनेकडे वळवणे. आमची राज्य सेवा एप्रिल २००५, पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवाच्या संघटनेकडे कोणत्या मार्गांनी वळवले ते श्रोत्यांना विचारा. एका अशा प्रचारकाची मुलाखत घ्या ज्याच्या बायबल शिक्षकाने असे केले होते.
गीत १५ (१२७)