फेब्रुवारी १५ च्या सप्ताहाचा आराखडा
फेब्रुवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ (१४३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १५-१८
क्र. १: शास्ते १६:१-१२
क्र. २: प्राथमिकता मांडणे (fy पृ. १२२ परि. १४, १५)
क्र. ३: येशूने सैतानाला “लबाडीचा बाप” का म्हटले? (योहान ८:४४)
❑ सेवा सभा:
गीत ६ (४५)
५ मि: घोषणा.
१५ मि: टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी. सादर केल्या जाणाऱ्या नियतकालिकातील लेखांची थोडक्यात उजळणी करा. व क्षेत्रातील लोकांना कोणते लेख आवडतील ते सुचवा. एक प्रचारक नियतकालिक सादर करण्याची तयारी कशी करतो ते स्वगतस्वरूपात अर्थात स्वतःशी बोलत असल्याचे दाखवा. क्षेत्रासाठी कोणता लेख उपयुक्त ठरेल, कोणता प्रश्न विचारायचा, कोणते वचन दाखवायचे हे तो ठरवतो. घरमालकाला आस्था आहे का नाही हे तो कसे ताडू शकेल व त्याच्या धार्मिक भावनांचा विचार करून स्वतःच्या प्रस्तावनेत कसा बदल करेल हे तो ठरवतो. नंतर तो नियतकालिकाचा वापर करून तयार केलेल्या प्रस्तावनेचा सराव करतो.
१५ मि: बुद्धिवाद केल्यामुळे लोकांना ऐकण्याचे उत्तेजन मिळते. आमची राज्य सेवा ऑक्टोबर २००५, पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित भाषण.
गीत २२ (१३०)