स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका जगभरात दिली जाईल!
१. स्मारकविधीच्या आधी जगभरात कोणती खास मोहीम राबवली जाणार आहे?
१ “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) येशूने दिलेल्या या आज्ञेनुसार यहोवाचे सेवक आस्थेवाईक लोकांसोबत मार्च ३०, २०१० रोजी येशूच्या मृत्यूचे स्मरण करणार आहेत. मार्च १३ ते मार्च ३० या तारखांदरम्यान संपूर्ण जगभरात स्मारकविधीच्या खास आमंत्रणपत्रिका वाटल्या जाणार आहेत.
२. आपण ही आमंत्रणपत्रिका कशी सादर करू शकतो?
२ तुम्ही ही आमंत्रणपत्रिका कशी सादर कराल: ही पत्रिका समंजसपणे व सांभाळून दिली पाहिजे. एखाद्या घरमालकाला येशूबद्दल आवड आहे असे तुम्हाला आढळल्यास तुम्ही ही पत्रिका त्याला देऊ शकता म्हणजे तो त्यावरील चित्र पाहू शकेल. मग तुम्ही असे म्हणू शकता: “मार्च ३० च्या सायंकाळी जगभरातील लाखो लोक येशूच्या मुत्यूचे स्मरण करण्यासाठी एकत्र येणार आहेत. तुम्ही सहकुटुंब या स्मारकविधीला उपस्थित राहावे म्हणून तुम्हाला मी आमंत्रण देत आहे. या कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण आमंत्रणपत्रिकेवर देण्यात आले आहे ते पाहा.” बायबलमध्ये ही आज्ञा कोठे दिली आहे ती दाखवण्यासाठी तुम्ही आधी परिस्थितीचा अंदाज घ्या आणि मग लूक २२:१९ वाचून दाखवा. आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यातच बोलणे योग्य ठरेल.
३. तुम्ही कोणाला आमंत्रित करू शकता?
३ योग्य असेल तर पत्रिकांसोबत तुम्ही नियतकालिकेही देऊ शकता. तुम्ही पुनर्भेट घेत असलेल्या, तुमचे बायबल विद्यार्थी, तुमच्यासोबत काम करणारे, शाळासोबती, नातेवाईक, व तुमच्या इतर ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्यायला विसरू नका.
४. यहोवाने खंडणी देण्याद्वारे दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसे दाखवू?
४ या मोहिमेत संपूर्णपणे भाग घेण्याची तयारी करा: सेवाकार्यातील सहभाग वाढवण्यासाठी स्मारकविधीचा काळ उत्तम आहे. सहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी तुम्ही काही तडजोडी करू शकता का? तुमची मुले किंवा बायबल विद्यार्थी चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहेत का? असे असल्यास ते या खास मोहिमेत बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक म्हणून भाग घेऊ शकतात का असे वडिलांना विचारा. यहोवाने आपल्यासाठी खंडणी देण्याद्वारे जे प्रेम दाखवले आहे त्याबद्दल कदर दाखवण्यासाठी आपण फक्त तेथे उपस्थितच राहणार नाही तर होता होईल तितक्या लोकांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ.—योहान ३:१६.