स्मारक विधीची जाहीरात करणारी खास मोहीम!
१. सर्व राज्य प्रचारक, मार्च २१, २००९ पासून जगव्याप्त स्तरावर सुरु होणाऱ्या कोणत्या एका वितरण कार्यात भाग घेणार आहेत, व का?
१ यहोवा देवाने मानवजातीवर दाखवलेल्या प्रेमाच्या सर्वश्रेष्ठ अभिव्यक्तीचे गुरुवार, एप्रिल ९, २००९ रोजी संपूर्ण जगभरातील यहोवाचे उपासक संस्मरण करतील. (रोम. ५:६-८) या प्रसंगी आपल्यासोबत लाखो आस्थेवाईक लोकही असतील, अशी आपण अपेक्षा करू शकतो. या स्मारक विधीची जाहीरात करणाऱ्या खास निमंत्रण पत्रिकेचे मार्च २१ पासून वाटप सुरु होईल.
२. आमंत्रण देताना तुम्ही कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत?
२ लक्षात ठेवण्याजोगे काही मुद्दे: आमंत्रण पत्रिकेवरील चित्रांचा, प्रश्नांचा व उद्धृत शास्त्रवचनांचा पुरेपूर उपयोग करा. उदाहरणार्थ, तुम्ही पत्रिकेच्या पहिल्याच पानावरील चित्राबद्दल असे म्हणू शकता: “गुरुवार, एप्रिल ९, २००९ रोजी येशूच्या मृत्यूचे संस्मरण करण्याकरता आम्ही एकत्र येणार आहोत. आणि या महत्त्वपूर्ण विधीस तुम्हीही उपस्थित राहावे म्हणून तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी मी आलो आहे.” मग, पत्रिकेवरील शीर्षक व त्याखालील प्रश्नही दाखवा. घरमालक त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाला व त्याच्या ओळखीच्या इतर लोकांनाही आणू शकतो, हे त्याला सांगायला विसरू नका.
३. मोहिमेदरम्यान आमंत्रण दिलेल्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा आठवण कशी देऊ शकता?
३ तुमच्या मंडळीचे सेवा क्षेत्र मोठे असेल तर वडील जन कदाचित तुम्हाला, दाराला कुलूप असलेल्या घरांमध्ये दाराखालून आत पत्रिका सरकावण्याच्या सूचना देतील. शनिवार-रविवारच्या दिवशी आमंत्रण पत्रिकांसोबतच नियतकालिकेही देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्यांना पुनर्भेट देत आहात अशांना, तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना, नातेवाईकांना, शाळासोबत्यांना, तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांना, शेजाऱ्यांना व इतर ओळखीच्या लोकांना आमंत्रण देण्याचा प्रयत्न करा. गेल्या वर्षी एका भगिनीने तिच्या ३० नातेवाईकांना आमंत्रण दिले व तो दिवस येण्याआधी वेळोवेळी ती त्यांना त्या प्रसंगाच्या महत्त्वाची आठवण करून देत राहिली. आमंत्रण मिळालेल्यांपैकी २५ जण जेव्हा स्मारक विधीला उपस्थित राहिले तेव्हा तिला खूप आनंद झाला. यांपैकी चौघांनी नंतर बायबल अभ्यास स्वीकारला.
४. आपण आत्तापासूनच कोणत्या योजना केल्या पाहिजेत व का?
४ आत्ताच योजना करा: अनेक प्रचारक मार्च व एप्रिल महिन्यांदरम्यान क्षेत्र सेवेतील त्यांचा सहभाग वाढवू शकतात. तुमची मुले किंवा बायबल विद्यार्थी प्रगती करत असतील तर त्यांना बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनण्याची ही उत्तम संधी असेल. या मोहिमेत प्रीतीच्या दोन महान अभिव्यक्तींच्या संस्मरणाची जाहिरात केली जाणार आहे. तेव्हा, यात पूर्ण सहभाग घेण्यासाठी आत्तापासूनच योजना करा.—योहा. ३:१६; १५:१३.