वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. २
  • कुशलतेने बायबलचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुशलतेने बायबलचा वापर करा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • सत्याचे वचन कुशलतेने हाताळा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
    आमची राज्य सेवा—२००४
  • क्षेत्र सेवेत पवित्र शास्त्राचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. २

कुशलतेने बायबलचा वापर करा

१. बायबल इतके उपयुक्‍त का आहे?

१ देवाच्या ईश्‍वरप्रेरीत वचनांचा कुशलतेने व समंजसपणे वापर केल्याने आपण सत्य स्पष्टपणे घोषित करू शकतो व शिकवू शकतो आणि खोट्या शिकवणींचा व मानवी प्रथांचा पर्दाफाश करू शकतो.—२ तीम. २:१५; १ पेत्र ३:१५.

२. कुशलतेने वचने काढण्यास तुम्हाला कशामुळे मदत होते?

२ बायबल चांगल्या प्रकारे माहीत करून घ्या: आपण एखाद्या साधनाचा जितका जास्त वापर करू तितके ते साधन चांगल्या प्रकारे वापरायला शिकू. बायबलचे प्रत्येक पान वाचून काढल्यामुळे आपल्याला त्याचा विषय समजतो. यामुळे वचने लक्षात राहतात व लवकर सापडतात. जसजसे तुम्ही बायबलशी परिचित होता तसतसे तुम्ही इतरांना अनौपचारीक साक्ष देताना व क्षेत्रसेवेत आवेशाने व ठामपणे बोलता.—१ थेस्सलनी. १:५.

३, ४. (क) बायबलशी परिचित होण्याचे काही मार्ग कोणते आहेत? (ख) बायबलशी परिचित होण्याचे आणखी काही मार्ग तुम्ही वापरले आहेत का?

३ मंडळीच्या सभेदरम्यान बायबल उघडून वचने बघण्याची सवय करून घ्या. वैयक्‍तिक अभ्यासाच्या वेळी किंवा सभेची तयारी करताना उद्धृत सर्व वचने पाहा व ती कशी लागू करता येतील यावर मनन करा. कंप्युटरच्या मॉनिटरवरून किंवा छापील वचने वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बायबलमधून वचने वाचल्यास नंतर सेवा कार्यात गरजेच्या वेळी ती लवकर सापडतात असे अनेकांना आढळून आले आहे.—योहा. १४:२६.

४ काही कुटुंबे बायबलची शास्त्रवचने पाठ करण्यासाठी खास वेळ काढतात. एका बाजूला फक्‍त बायबलचे वचन लिहिलेले असते व दुसऱ्‍या बाजूला त्या वचनात काय सांगितले आहे ते लिहिलेले असते अशा कार्डाचा वापर ते करतात. ते आळीपाळीने वचने आठवण्यासाठी व ती कोठे आहेत हे शोधण्यासाठी या कार्डाचा वापर करतात. क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्‍या प्रस्तावनांचा आणि घरमालक उपस्थित करत असलेल्या आक्षेपांचे वा प्रश्‍नांचे उत्तर बायबलमधून कुशलतापूर्वक कसे द्यावे याचा सराव केल्याने आपण क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

५. बायबल हाताळण्याचे आपले कौशल्य आपण का वाढवले पाहिजे?

५ बायबलची बरोबरी इतर कोणत्याही पुस्तकाशी होत नाही. फक्‍त हेच असे पुस्तक आहे ज्याच्यातील मजकूर लोकांना “तारणासाठी ज्ञानी” बनवतो. (२ तीम. ३:१५) आपल्या क्षेत्रात अनेक लोकांना बायबलमध्ये किती मौल्यवान माहितीचा साठा आहे हे ठाऊक नसल्यामुळे बायबलमध्ये असलेली उपयुक्‍त माहिती दाखवण्याचे आपले कौशल्य वाढवण्याची आपल्याला संधी आहे.—नीति. २:१-५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा