वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 जून पृ. ३२
  • वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • कुशलतेने बायबलचा वापर करा
    आमची राज्य सेवा—२००९
  • पवित्र शास्त्राकडे लक्ष वेधवणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 जून पृ. ३२

अभ्यासासाठी टीप

वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .

तुमचं एखादं आवडीचं वचन आहे का? त्या वचनामुळे तुम्हाला कदाचित सांत्वन मिळत असेल, वाईट विचारांवर मात करता येत असेल किंवा ते एखाद्याला पाठवावंसं वाटत असेल. (स्तो. ११९:११, १११) पण असं कधी झालंय का, की नेमक्या वेळी तुम्हाला ते वचनच आठवत नाही? खाली दिलेल्या मार्गांमुळे तुम्हाला वचनं लक्षात ठेवायला मदत होऊ शकते.

  • JW लायब्ररी ॲपचा वापर करा. JW लायब्ररीवर बायबल वाचत असताना तुम्हाला एखादं वचन आवडलं, तर ते आठवणीत ठेवण्यासाठी टॅगचा वापर करून ते सेव (save) करा. म्हणजे तुम्हाला ते नंतर सहज सापडेल.

  • सहज दिसेल अशा ठिकाणी ते वचन लावून ठेवा. तुम्हाला जे वचन लक्षात ठेवायचंय ते कागदावर लिहा आणि तो कागद सहज दिसेल अशा ठिकाणी चिकटवा. काही जण तो आरशावर लावतात किंवा फ्रिजच्या दारावर लावतात. असेही काही जण आहेत जे त्यांच्या आवडत्या वचनाचा फोटो काढून तो फोनचा किंवा कंप्युटरचा वॉलपेपर म्हणून ठेवतात.

  • फ्लॅश कार्ड बनवा. कार्डच्या एका बाजूला वचन लिहा आणि दुसऱ्‍या बाजूला त्या वचनात काय म्हटलंय ते लिहा. वचन लिहिलेली बाजू पाहून वचनात काय लिहिलंय ते आठवायचा प्रयत्न करा किंवा दुसरी बाजू पाहून वचन आठवायचा प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा