वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०४ पृ. ४
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • प्रगतीशील बायबल अभ्यास चालवणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ११/०४ पृ. ४

प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे

भाग ३: शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग करणे

१. बायबल अभ्यास संचालित करत असताना आपण शास्त्रवचनांवर भर का दिला पाहिजे?

१ बायबल अभ्यास संचालित करण्यामागचा आपला हेतू लोकांना ‘शिष्य बनवणे’ हा आहे; देवाच्या वचनातील शिकवणुकी समजून घेऊन, त्या स्वीकारून व आपल्या जीवनात लागू करण्यास मदत करण्याद्वारे आपण त्यांना शिष्य बनवतो. (मत्त. २८:१९, २०; १ थेस्सलनी. २:१३) त्यामुळे, आपण जो अभ्यास घेतो तो शास्त्रवचनांवर आधारित असला पाहिजे. सुरवातीला, तुम्ही विद्यार्थ्यांना बायबलच्या त्यांच्या व्यक्‍तिगत प्रतीतून विशिष्ट वचने काढायला शिकवू शकता. पण अशा नवोदितांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपण शास्त्रवचनांचा उपयोग कशारीतीने करू शकतो?

२. कोणते बायबल वचन वाचायचे व त्यावर अधिक चर्चा करायची हे आपण कसे ठरवू शकतो?

२ वाचण्यासाठी शास्त्रवचने निवडा: तयारी करत असताना, धड्यातील प्रत्येक शास्त्रवचन माहितीला कसे लागू होते ते पाहा आणि मग अभ्यासाच्या वेळी कोणते वचन वाचायचे व त्यावर अधिक चर्चा करायची ते ठरवा. सहसा, आपल्या विश्‍वासांना आधार देणारी शास्त्रवचने वाचणे बरे राहील. पार्श्‍वभूमिची माहिती देणारी वचने वाचली नाहीत तरी चालेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवश्‍यकतेचा आणि परिस्थितीचा देखील विचार करा.

३. प्रश्‍नांचा उपयोग केल्यामुळे काय फायदा होतो आणि हे आपण कसे करू शकतो?

३ प्रश्‍नांचा उपयोग करा: तुम्ही बायबल वचनांचे स्पष्टीकरण देण्याऐवजी, बायबल विद्यार्थ्याला त्यांचे स्पष्टीकरण देऊ द्या. प्रश्‍नांचा विचारपूर्वक वापर करून तुम्ही त्याला असे करण्यास प्रवृत्त करू शकता. शास्त्रवचनाचा अर्थ स्पष्ट असेल तर तुम्ही विद्यार्थ्याला केवळ असे विचारू शकता, की हे शास्त्रवचन परिच्छेदात जे म्हटले आहे त्याला कसे लागू होते. इतर वेळेला, विद्यार्थ्यास उचित निष्कर्षापर्यंत पोचण्यास मदत करण्यासाठी तुम्हाला त्याला विशिष्ट प्रश्‍न किंवा प्रश्‍ने विचारावे लागतील. आणखी स्पष्टीकरणाची गरज असेल, तर विद्यार्थ्याने उत्तर देऊन झाल्यावर द्या.

४. आपण वाचत असलेल्या शास्त्रवचनांचे कितपत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे?

४ अभ्यास साधाच राहू द्या: एक कुशल धनुर्धर सहसा, एकाच बाणात निशाणा गाठतो. तसेच, एका कुशल शिक्षकाला, एक मुद्दा स्पष्ट करायचा असतो तेव्हा तो पुष्कळ शब्दांचा उपयोग करत नाही. तो साधीसोपी, स्पष्ट व अचूक माहिती देऊ शकतो. कधीकधी तुम्हाला, एखाद्या शास्त्रवचनाचा अर्थ नीट समजण्याकरता व त्याचे स्पष्टीकरण अचूक देता यावे म्हणून ख्रिस्ती प्रकाशनांमध्ये संशोधन करावे लागेल. (२ तीम. २:१५) परंतु अभ्यासाच्या वेळी वचनातील प्रत्येक पैलूचे स्पष्टीकरण देत बसू नका. ज्या मुद्द्‌यावर चर्चा चालली आहे तो मुद्दा समजावून सांगण्याकरता लागणारी माहितीच तेवढी सांगा.

५, ६. आपण विद्यार्थ्यांना देवाचे वचन आपल्या जीवनात लागू करण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो, पण आपण काय करू नये?

५ शास्त्रवचन व्यवहारात कसे लागू करायचे ते दाखवा: उचित असते तेव्हा, विद्यार्थ्याला हे पाहण्यास मदत करा, की बायबलची वचने त्याला स्वतःला कशी लागू होतात. उदाहरणार्थ, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला अद्याप सुरवात न केलेल्या विद्यार्थ्यासोबत इब्री लोकांस १०:२४, २५ या वचनाची चर्चा करत असताना तुम्ही, एखाद्या सभेविषयी सांगू शकता आणि त्या सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण त्याला देऊ शकता. पण बळजबरी करू नका. देवाचे वचन त्याला, यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आवश्‍यक ते पाऊल उचलण्याची प्रेरणा देईल.—इब्री ४:१२.

६ शिष्य बनवण्याची कामगिरी पूर्ण करत असताना शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग करण्याद्वारे आपण “विश्‍वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण” करू या.—रोम. १६:२६, ईजी टू रीड वर्शन.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा