वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०९ पृ. १
  • २०१० चा खास संमेलन दिवस कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०१० चा खास संमेलन दिवस कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • “यथाकाळी” मिळणारे आध्यात्मिक अन्‍न
    आमची राज्य सेवा—२०१०
  • संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था
    आमची राज्य सेवा—२००४
  • देवाच्या वचनात सामर्थ्य आहे
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ८/०९ पृ. १

२०१० चा खास संमेलन दिवस कार्यक्रम

१. (क) मागील काही वर्षांमध्ये आपल्या खास संमेलन दिवशी शास्त्रवचनातील कोणत्या काही विषयांवर चर्चा करण्यात आली होती? (ख) आधीच्या खास संमेलन दिवसातील कोणते विशिष्ट मुद्दे तुम्हाला आठवतात ज्यांचा तुम्हाला प्रचार कार्यात फायदा झाला आहे?

१ ‘जे श्रेष्ठ ते पसंत करा,’ ‘एक कळप असे एकचित्ताने स्थिर राहा,’ ‘सत्याविषयी साक्ष देत राहा,’ आणि ‘आम्ही माती आहोत, यहोवा आमचा कुंभार आहे.’ (फिलिप्पै. १:९, १०, २७; योहा. १८:३७; यश. ६४:८) वर दिलेल्या या विषयांवर आधीच्या काही खास संमेलन दिवसांमध्ये चर्चा करण्यात आली होती. २०१० च्या सेवा वर्षात होणाऱ्‍या खास संमेलन दिवसाला उपस्थित राहण्यास तुम्ही उत्सुक आहात का? “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” हा १ करिंथकर ७:२९ या वचनावर आधारित असलेला संमेलनाचा विषय असेल.

२. या संमेलनासाठी तुम्ही उत्साह कसा वाढवू शकता?

२ तुमच्या मंडळीत खास संमेलन दिवसाची तारीख सांगितली जाते तेव्हा तुम्ही त्याबद्दल उत्साहाने एकमेकांबरोबर बोलू शकता. काही पालक आपल्या मुलांच्या मनात या संमेलन दिवसाबद्दल उत्सुकता राहावी म्हणून घरातील कॅलेंडरवर, प्रत्येक सदस्याने संमेलनाला काय काय नेले पाहिजे त्याच्या नोंदी शेजारीच ती तारीख लिहून ठेवतात, व आत्तापासून किती दिवस उरले आहेत ते मोजत राहतात. तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या दिवशी आधीच्या खास संमेलन दिवस कार्यक्रम नोंदींची उजळणी तुम्ही करू शकता. या संमेलन दिवसासाठी तुमचे मन तयार करण्यासाठी तुम्ही ईश्‍वरशासित सेवा प्रशाला प्रशिक्षणाचा लाभ घ्या पुस्तकातील पृष्ठे १३-१६ वरील माहितीची उजळणी करू शकता. यामुळे “तुम्ही कसे ऐकता” याकडे लक्ष द्यायला तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मदत होईल.—लूक ८:१८.

३. मिळणाऱ्‍या माहितीचा पुरेपूर फायदा आपण कसा घेऊ शकतो?

३ तुम्ही जे शिकता त्याचा वापर करा: “काय छान होता ना कार्यक्रम!” असे उद्‌गार सहसा संमेलनानंतर आपल्याला ऐकायला मिळतात. हे खरेच आहे कारण यहोवाने पुरवलेल्या अनेक समृद्ध तरतुदींपैकी ही देखील एक तरतूद आहे. (नीति. १०:२२) तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही त्यावर मनन केले पाहिजे व त्या आठवणीत ठेवल्या पाहिजे. (लूक ८:१५) संमेलनावरून घरी परत जाताना संमेलनातील कार्यक्रमाबद्दल आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा ज्यांच्यासोबत आपण प्रवास करतो त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ काढा. एकमेकांसोबत तुमची काय ध्येये आहेत व मिळालेल्या माहितीचा प्रचार कार्यात कसा उपयोग करता येईल याची चर्चा करा. असे केल्याने मिळालेल्या माहितीचा फायदा संमेलनानंतरही दिर्घकाळासाठी तुम्हाला होईल.—याको. १:२५.

४. आपल्यासाठी हे संमेलन खास का असणार आहे?

४ आपल्याला ज्याची गरज होती तीच वस्तु आपल्याला भेट म्हणून मिळते तेव्हा आपण किती भारावून जातो. आपल्या येणाऱ्‍या खास संमेलन दिवस कार्यक्रमात यहोवाने आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ते जाणण्यास आपण उत्सुक आहोत का? त्या संमेलनात मिळणारी माहिती आपल्यासाठी खूप व्यावहारिक असेल याची आपण खात्री बाळगू शकतो. आपल्याला जिची गरज आहे तीच भेट, आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्याकडून मिळण्याची अपेक्षा आपण करू शकतो. प्रोत्साहन व त्याने नेमून दिलेले काम करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण यांच्याद्वारे यहोवा ती भेट आपल्याला देणार आहे.—२ तीम. ४:२; याको. १:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा