नियतकालिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज एप्रिल ते जून
“देव सर्वच प्रार्थना ऐकतो का, तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐका.] आपण अंतःकरणापासून प्रार्थना कशी करू शकतो याबद्दल एक उपयुक्त सल्ला मी तुम्हाला दाखवला तर चालेल का? [घरमालकाची ऐकायची इच्छा असेल तर मत्तय ६:७ त्याला वाचून दाखवा.] या रोचक लेखात प्रार्थनेबद्दल नेहमी विचारल्या जाणाऱ्या चार प्रश्नांची शास्त्रावर आधारित उत्तरे दिली आहेत.” पान १६ वरील लेख दाखवा.
टेहळणी बुरूज जुलै ते सप्टेंबर
“स्वच्छ वातावरणात राहायला सर्वांनाच आवडते, नाही का? आपल्या उपासकांनी स्वच्छ राहिले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? [उत्तर ऐका.] याबद्दल देवाचे काय म्हणणे आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास १ पेत्र १:१६ वाचा. त्यानंतर पान ९ वरील लेख दाखवा.] स्वच्छता राखण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावले उचलली पाहिजेत याबद्दल यात माहिती दिली आहे.”