वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०९ पृ. २
  • सेवा सभेची तयारी कशी करावी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभेची तयारी कशी करावी?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • सेवा सभेतील भाग हाताळणाऱ्‍यांसाठी सूचना
    आमची राज्य सेवा—२०१०
  • सेवा सभा आम्हाला प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज करते
    आमची राज्य सेवा—१९९४
  • सभा लाभदायक बनविण्यामध्ये तुमचा सहभाग
    आमची राज्य सेवा—१९९०
  • माहितीयुक्‍त साहित्य, स्पष्टपणे सादर केलेले
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ५/०९ पृ. २

सेवा सभेची तयारी कशी करावी?

१. सेवा सभेची योजना कशासाठी करण्यात आली आहे व तिचा आपण पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो?

१ आपले सेवाकार्य परिणामकारक व्हावे या हेतूने सेवा सभेची योजना करण्यात आली आहे. या सभेत राज्याच्या सुवार्तेचा प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य कसे करावे तसेच देवाच्या न्यायदंडाची घोषणा कशी करावी यावर भर दिला जातो. (मत्त. २८:२०; मार्क १३:१०; २ पेत्र ३:७) या सभेची उत्तम तयारी केल्यास व त्यात सहभाग घेतल्यास आपल्याला या सभेचा पूर्ण लाभ घेता येईल.

२. भाषण लक्षपूर्वक ऐकता यावे म्हणून तुम्ही कोणती तयारी करू शकता?

२ भाषण: सभेत दिले जाणारे भाषण कशावर आधारित आहे याचा उल्लेख सहसा वक्त्यासाठी दिलेल्या सूचनांमध्ये केलेला असतो. सभेला येण्याआधी तुम्ही तो भाग व त्यात उल्लेखिलेली शास्त्रवचने वाचू शकता आणि त्यातील माहितीचा आपल्या क्षेत्र सेवेत कसा उपयोग करता येईल यावर विचार करू शकता.

३. प्रश्‍न आणि उत्तरांच्या भागाची चर्चा करण्याकरता आपण पूर्व तयारी कशी करू शकतो?

३ प्रश्‍न आणि उत्तरांची चर्चा: हा भाग टेहळणी बुरूज अभ्यासारखाच हाताळला जातो. टेहळणी बुरूज अभ्यासाच्या सुरुवातीला व समाप्तीला संक्षिप्त टिपणी केली जाते तशीच संक्षिप्त टिपणी, हा भाग हाताळताना देखील केली जाते. प्रत्येक परिच्छेदातील मुख्य मुद्दे अधोरेखित करा आणि संक्षिप्त व मुद्देसूद उत्तरे द्यायला तयार असा.

४. श्रोत्यांबरोबर चर्चा या भागाची तुम्ही तयारी कशी करू शकता?

४ श्रोत्यांबरोबर चर्चा: हा भाग भाषणाच्या स्वरूपात सादर केला जातो व वक्‍ता श्रोत्यांबरोबर त्याची चर्चाही करतो. तेव्हा, तुम्ही मुख्य मुद्दे अधोरेखित केले व उल्लेखिलेली शास्त्रवचने आधीच वाचून काढलीत तर वक्‍ता प्रश्‍न विचारतो तेव्हा तुम्हाला उत्तरे देता येतील. हा भाग हाताळणाऱ्‍या बांधवाने श्रोत्यांबरोबर चर्चा करून लेखातील मुख्य मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करावा.

५. प्रात्यक्षिकांपासून जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

५ प्रात्यक्षिके: चर्चा केल्या जाणाऱ्‍या माहितीचा आपल्या क्षेत्रात उपयोग कसा करता येईल हे दाखवण्यासाठी सभांच्या काही भागांमध्ये, वास्तविक परिस्थितीवर आधारित प्रात्यक्षिके दाखवली जातात. मंडळीतील वडिलांना, अनुभवी प्रचारकांना किंवा पायनियरांना ही प्रात्यक्षिके दाखवण्यास सांगितले जाते. त्यामुळे या भागाची तुम्ही अगाऊ तयारी केल्यास ते प्रात्यक्षिक कसे सादर केले जाईल याचा तुम्ही आधीच अंदाज लावू शकता. एखाद्या नमुना सादरीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवले जाते तेव्हा, मला ते स्वतःच्या शब्दांत कसे मांडता येईल व क्षेत्रात भेटणाऱ्‍या निरनिराळ्या लोकांना ते कसे लागू केले जाऊ शकते, याचा तुम्ही विचार करू शकता. प्रात्यक्षिकात वापरले जाणारे प्रकाशन अथवा नियतकालिक न विसरता सभेला घेऊन जा. तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी यांपैकी काही प्रात्यक्षिकांचा सराव केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

६. सेवा सभेची तयारी करण्यामागील कोणती काही कारणे आहेत?

६ सेवा सभेची पूर्व तयारी केल्यास व तिथे जे काही शिकवले जाणार आहे त्याचा आधीच विचार केल्यास ही सभा आपल्याला अधिक रोचक वाटेल. दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने आपण एकमेकांना अधिक उत्तेजन देऊ शकू. (रोम. १:११, १२) सेवा सभेची तयारी करण्यासाठी वेळ काढल्यास आपल्याला सोपवलेली सेवा पूर्ण करण्यासाठी आपण सुसज्ज होऊ.—२ तीम. ३:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा