सेवा सभा आम्हाला प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज करते
१ प्रचार आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात अधिक पूर्णतेने सहभाग घेण्यात सेवा सभेचा उद्देश, प्रवृत्त करणे आणि सज्ज करण्याचा आहे. (२ तीम. ३:१७) तथापि, आम्ही सभेची चांगली तयारी केली नाही, किंवा आम्ही शिकत असलेल्या गोष्टींचा अवलंब केला नाही तर, त्याचा लाभ अल्प होईल.
२ आगाऊ तयारी केल्याने, तुम्हाला अधिक पूर्णतेने सूचना आत्मसात करण्यास मदत मिळेल. वापरल्या जाणाऱ्या प्रकाशनांची उजळणी करा व त्यांना तुमच्या सोबत आणा. यामुळे, तुम्ही त्यांना पडताळून पाहू शकता आणि सहभाग घेऊ शकता. लक्षपूर्वक ऐकणारे असा. नंतर उपयोगात आणण्यासाठी नोंदी घ्या.
३ अध्यक्षीय पर्यवेक्षक, आराखड्यानुसार सभेच्या भागांची उजळणी करतील. त्यांची तयारी करण्यासाठी कार्यक्षम, योग्य वडिलांना आणि सेवा सेवकांना ती नेमून दिलेली असतात. (om पृ. ७०) मंडळीत थोडके वडील व सेवा सेवक असतील तर, इतर लायक बांधवांना त्यांची मदत करण्यास नेमून दिले जाऊ शकते. (km ११/७६, प्रश्न पेटी) प्रत्येक वक्त्याने संपूर्ण तयारी करावी. त्याने पुरवलेल्या मार्गदर्शनाचे जवळून पालन करावे. तो नेमलेल्या वेळेबाहेर जाणार नाही याची खात्री करावी.
४ साधारणतः, सभेची सुरवात घोषणेने होते. नेमून दिलेल्या बांधवाने, कोणत्या बाबींचा उल्लेख करण्याची गरज आहे ते पाहण्यासाठी आधीच अध्यक्षीय पर्यवेक्षकांना भेटावे. यामध्ये, संस्थेची पत्रे किंवा सेवेच्या व्यवस्थांबद्दल स्मरण घडवून देणाऱ्या गोष्टी किंवा महिन्याच्या अहवालांचा समावेश असू शकेल. भेट देण्याची आवश्यकता आहे अशा आजारी व्यर्क्तिबद्दल आम्हाला कळेल किंवा भविष्यासाठी योजिलेल्या मंडळीच्या कार्यांबद्दलच्या सविस्तर माहितीबद्दल आम्ही ऐकू. नीट लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल व तुम्ही तुमचा वाटा पार पाडण्यासाठी तयार असाल.
५ सभेच्या एखाद्या भागामध्ये श्रोत्यांचा सहभाग आवश्यक असेल तर, साहित्य संपूर्ण वाचण्याद्वारे व वचनांना पडताळण्याद्वारे तयारी करा. सूचनांचा अवलंब कसा करावा असे तुम्हाला वाटते आणि इतरांचे उत्तेजन करण्याकरता तुम्ही कोणत्या प्रकारची विवेचने द्याल, याबद्दल विचार करा. एखाद्या संक्षिप्त अनुभवाचे कथन करून तुम्ही सूचनेच्या व्यावहारिक मूल्याचे स्पष्टीकरण देऊ शकाल.
६ एखादे प्रात्यक्षिक असेल तर, तशाच परिस्थितींमध्ये स्वतःला ठेवून, तेव्हा तुम्ही काय बोलला असता यावर विचार करा. कोणती कारणे उपयोगात आणली गेली व कशाप्रकारे युक्तिवाद केला गेला, याची नोंद घ्या. तुम्ही त्याप्रकारच्या परिस्थितीत होता त्यावेळी काय म्हटले होते त्याची आठवण करा. प्रदर्शित केलेले मुद्दे तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम परिणाम मिळवण्यास कसे मदत करतील यावर विचार करा.
७ प्रात्यक्षिके व मुलाखतींमध्ये भाग घेणाऱ्यांनी, आधीच चांगली तालीम करावी. प्रत्येकाला तो काय म्हणणार आहे, आणि व्यासपीठावर त्याला काय करावयाचे आहे हे माहीत असले पाहिजे. तालीम न केलेल्या भागांमुळे बहुधा श्रोत्यांना प्रेरणा किंवा उत्तेजन मिळत नाही. काही जण, तयारी करून टेहळणी बुरुज अभ्यासानंतर सराव करावयास येतात. यामुळे ते व्यासपीठावर सराव करू शकतात आणि गरज असेल त्या गोष्टीबद्दल माईक हाताळणाऱ्या बांधवांना सांगू शकतात.
८ कार्यक्रमामध्ये कधीकधी, मंडळीच्या विशिष्ट गरजेबद्दल एखादे भाषण असेल, किंवा एखादा समयोचित टेहळणी बुरुजचा लेख असेल. नीट लक्ष देऊन ऐका. सल्ल्याचा गंभीरपणे विचार करा. त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा.
९ आम्हाला, “प्रत्येक चांगल्या कामास तयार” व्हावयाचे आहे. (२ तीम. २:२१) तसे करण्यात आमची मदत करण्यासाठी यहोवा करत असलेल्या तरतूदींपैकी सेवा सभा ही एक आहे. नियमित उपस्थितीमुळे आणि आम्ही शिकत असलेल्या गोष्टींना उपयोगात आणण्यास केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे “[आम्हाला] सोपविलेली सेवा पूर्ण,” करण्यास ते नक्कीच मदत करील.—२ तीम. ४:५.