नियतकालिके कशी सादर कराल?
टेहळणी बुरूज जानेवारी ते मार्च
“आजकाल पतीपत्नीतील नातेसंबंध बराच तणावपूर्ण बनत आहे. त्यामुळे त्यांच्यातील बंधन सहज तुटण्याची शक्यता आहे. तेव्हा, पती व पत्नी आपले वैवाहिक बंधन मजबूत कसे करू शकतात? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला एका प्राचीन ग्रंथातून एक तत्त्व वाचून दाखवू का? या तत्त्वाचे पतीपत्नींनी पालन केल्यास, त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंद वाढू शकतो. [घरमालकाला ऐकायची इच्छा असेल तर इफिसकर ५:३३ वाचून दाखवा.] पृष्ठ १८ वरील लेख दाखवून म्हणा: ‘वैवाहिक बंधन टिकवून ठेवण्यासाठी या लेखात अनेक तत्त्वांची चर्चा करण्यात आली आहे.’”
टेहळणी बुरूज एप्रिल ते जून
“पुष्कळ लोक, मरण पावलेल्या लोकांना घाबरतात. तुम्हाला भीती वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] मरण पावलेल्यांची काय स्थिती आहे याविषयी, ज्याने आपल्याला जीवन दिले आहे तो काय म्हणतो हे मी तुम्हाला दाखवू का? [घरमालकाने जर होकारार्थी उत्तर दिले तर उत्पत्ति ३:१९ वाचा.] पृष्ठ ११ वरील लेख काढा आणि म्हणा: ‘आपण मरण पावलेल्या लोकांना का घाबरू नये याची आणखी काही कारणे या लेखात दिली आहेत.’”