कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?
जगभरातील अनेक वैद्यकीय केंद्रांत आजकाल रक्ताविना शस्त्रक्रिया केल्या जातात. रक्ताविना केल्या जाणाऱ्या उपचाराचे कोणकोणते वैद्यकीय पर्याय उपलब्ध आहेत याविषयीची तुम्हाला सविस्तर माहिती आहे का? असेल, तरच तुम्हाला रक्ताविना केले जाणारे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया नीट समजतील व त्यानुसार तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नो ब्लड—मेडिसीन मीट्स द चॅलेंज हा व्हिडिओ पाहा. नंतर, खाली दिलेल्या प्रश्नांच्या साहाय्याने, व्हिडिओत पाहिलेल्या माहितीवर प्रार्थनापूर्वक मनन करा.—सूचना: या व्हिडिओत शस्त्रक्रियेची काही संक्षिप्त दृश्ये आहेत. तेव्हा, हा व्हिडिओ आपल्या लहान मुलांना दाखवायचा की नाही, हे पालकांनी ठरवावे.
(१) यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण स्वीकारत नाहीत यामागचे सर्वात प्रमुख कारण कोणते? (२) वैद्यकीय औषधोपचारांच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांची काय इच्छा आहे? (३) रुग्णांना कोणता मूलभूत अधिकार आहे? (४) रक्त संक्रमणाऐवजी इतर पर्याय निवडण्याचा निर्णय समंजस व मागचा-पुढचा विचार करून घेतलेला निर्णय का आहे? (५) रुग्णाच्या शरीरातून बरेच रक्त वाया जाते तेव्हा, डॉक्टरांजवळ ताबडतोब करण्याजोगे कोणते दोन उपाय असतात? (६) रक्ताविना केलेला उपचार कोणत्या चार तत्त्वांवर आधारित आहे? (७) डॉक्टर (क) शरीरातून जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी कसे करू शकतात, (ख) शरीरातल्या लाल रक्त पेशींचे रक्षण कसे करू शकतात, (ग) शरीरात रक्त उत्पन्न करण्याच्या नैसर्गिक क्रियेला चालना कशी देऊ शकतात, (घ) शरीरातून वाया गेलेल्या रक्ताची कमी कशी भरून काढू शकतात? (८) (क) हिमोडायल्युशन व (ख) सेल सॅलवेज या प्रक्रियांचे वर्णन करा. (९) संक्रमणाऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पर्यायांसंबंधी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे? (१०) गंभीर स्वरूपाच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रक्त संक्रमणाशिवाय करणे शक्य आहे का? (११) वैद्यकीय क्षेत्रात कोणते सकारात्मक बदल घडून येत आहेत?
या व्हिडिओपटात दाखवलेले काही उपचार स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकावर अवलंबून असलेला प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. संक्रमणाऐवजी वापरले जाणारे कोणते उपचार व पद्धती तुम्ही स्वतःकरता व आपल्या मुलांकरता स्वीकाराल हे ठरवून तुम्ही ॲडव्हान्स हेल्थ केअर डिरेक्टिव कार्ड भरले आहे का? याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर, टेहळणी बुरूज जून १५, २००४ आणि ऑक्टोबर १५, २००० या दोन्ही अंकांतील “वाचकांचे प्रश्न” या लेखाचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतर, तुम्ही कोणते पर्याय स्वीकाराल अथवा नाकाराल हे ठरवण्याकरता, आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ यातील, “रक्ताचे अंश आणि माझ्याच रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?” या पुरवणीत दिलेल्या प्रश्नावलींचा उपयोग करा. यानंतरच मग ॲडव्हान्स हेल्थ केअर डिरेक्टिव कार्डवर तुमच्या निवडी अचूकपणे लिहा. तातडीच्या प्रसंगी संपर्क साधण्याकरता तुम्ही ज्यांचा पत्ता किंवा फोन नंबर दिला आहे त्यांना, व तुमच्या कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांना, तुम्ही घेतलेल्या निर्णयांविषयी व त्यांमागील कारणांविषयी स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
[३ पानांवरील चौकट]
• स्वतःसाठी आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही कोणते वैद्यकीय उपचार व पद्धती स्वीकारणार हे ठरवले आहे का?
• तातडीचा प्रसंग आल्यास तुमच्याजवळ तुमचे भरलेले ॲडव्हान्स हेल्थ केअर डिरेक्टिव कार्ड नेहमी असते का?