स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांना आपण मदत कशी करू शकतो?
१. मार्च २२, २००८ रोजी कोणती जबरदस्त साक्ष लोकांना दिली जाणार आहे?
१ मार्च २२, २००८ रोजी संपूर्ण जगभरातील अब्जावधी लोकांना एक जबरदस्त साक्ष मिळेल. यहोवाने मानवजातीसाठी खंडणी देऊन आपले महान प्रेम कसे व्यक्त केले त्याविषयी स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांना ऐकायला मिळेल. (योहा. ३:१६) त्यांना देवाच्या राज्याविषयी आणि या राज्यामार्फत यहोवा देव पृथ्वीवर आपली इच्छा कशा प्रकारे पूर्ण करेल याविषयी शिकायला मिळेल. (मत्त. ६:९, १०) देवाच्या लोकांत असलेले प्रेम आणि ऐक्य ते आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतील व तिथले प्रेमळ वातावरण अनुभवतील.—स्तो. १३३:१.
२. स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या बायबल विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?
२ बायबल विद्यार्थी: उपस्थित असलेल्यांपैकी काही जण असे असतील ज्यांनी आपल्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. अशांची ओळख इतर बंधूभगिनींशी करून द्या. त्यांना साप्ताहिक सभांविषयी सांगा आणि राज्य सभागृह थोडक्यात फिरून दाखवा. स्मारकविधीच्या भाषणादरम्यान वक्ता अशा नवीन जनांना आध्यात्मिक प्रगती करीत राहण्याचे उत्तेजन देईल. तेव्हा, वक्त्याने आपल्या भाषणात जे सांगितले ते तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगून उत्तेजन देऊ शकता.
३. स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या निष्क्रिय प्रचारकांना कशा प्रकारे उत्तेजन देता येईल?
३ निष्क्रिय झालेले: स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांपैकी काही जण निष्क्रिय प्रचारक असतील. अशांना तुम्ही स्वतःहून जाऊन भेटा. त्यांना खाजगी प्रश्न विचारू नका किंवा ज्यामुळे त्यांना लाज वाटेल असे काहीही बोलू नका. स्मारकविधी झाल्यानंतर काही दिवसांनी अथवा आठवड्यांनी वडिलांनी, स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या या निष्क्रिय प्रचारकांना भेटले पाहिजे. स्मारकविधीला उपस्थित राहण्याकरता त्यांनी प्रयत्न केला म्हणून ते त्यांची प्रशंसा करतील आणि मंडळीच्या पुढील सभेला त्यांनी यावे म्हणून त्यांना प्रेमळपणे आमंत्रण देतील.
४. स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या इतर जणांना आपण प्रत्येकजण कशा प्रकारे मदत करू शकतो?
४ इतर जण: स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये काही जण आपण ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे कौटुंबिक सदस्य असतील. इतर जणांना स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेदरम्यान आमंत्रण मिळाले असेल. तुम्हाला जर कोणी अनोळखी व्यक्ती दिसत असेल तर तिच्याकडे जाऊन स्वतःचा परिचय करून द्या आणि स्मारकविधीला आल्याबद्दल तिचे स्वागत करा. कदाचित यापूर्वी ते कधीही आपल्या सभेला आले नसावेत. त्यांच्याबरोबर बोलत असताना तुम्हाला त्यांच्याशी नंतर कशा प्रकारे संपर्क साधता येईल, हे समजेल. स्मारकविधीनंतर काही दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू शकता किंवा फोन करू शकता व त्यांना अधिक माहिती घेण्यास व बायबल अभ्यास करण्यास उत्तेजन देऊ शकता.
५. बायबल अभ्यास सुरू करण्याकरता आपण काय म्हणू शकतो?
५ स्मारकविधीच्या भाषणात उपयोग करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर तुम्ही बायबल काय शिकवते पुस्तक पुनर्भेटीत सादर करू शकता. उदाहरणार्थ, स्मारकविधीचे भाषण देणारा वक्ता यशया ६५:२१-२३ ही वचने वाचून दाखवेल. पुनर्भेटीत तुम्ही भाषणाचा उल्लेख करून असे म्हणू शकता: “खंडणीमुळे आणखी कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतात हे मी तुम्हाला दाखवतो.” मग बायबल काय शिकवते पुस्तकातील पृष्ठे ४ व ५ दाखवा. किंवा तुम्ही असे म्हणू शकता: “यशयाच्या भविष्यवाणीतील शब्दांची पूर्णता आपल्याला केव्हा अनुभवायला मिळेल, असा प्रश्न काहींच्या मनात येतो.” पुस्तकाचा ९ वा अध्याय काढा आणि १-३ परिच्छेदांवर चर्चा करा. दुसरा एक पर्याय म्हणजे, स्मारकविधीचे भाषण देणाऱ्या वक्त्याच्या भाषणातील मुद्द्यांचा उल्लेख करा आणि सरळ बायबल काय शिकवते पुस्तकातून बायबल अभ्यास कसा करता येईल ते दाखवा.
६. येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याविषयी त्याने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याकरता आपल्याजवळ कोणकोणत्या संधी आहेत?
६ स्मारक विधीला आलेले बायबल विद्यार्थी, निष्क्रिय प्रचारक व इतर जण यांना मदत करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाने संधी शोधावी. (लूक २२:१९) राज्याच्या कार्यात आपण जी काही वाढ करू त्यावर यहोवा निश्चितच आशीर्वाद देईल.