मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज डिसें. १
“आपल्या सर्वांनाच आनंदी व अर्थपूर्ण जीवन हवे आहे. आनंदाची गुरुकिल्ली काय आहे याविषयी येशूने येथे जे म्हटले आहे त्याजशी तुम्ही सहमत आहात का? [मत्तय ५:३ वाचा आणि उत्तरासाठी थांबा.] आपल्या सर्वांनाच जन्मतः एक मूलभूत गरज आहे. ती आहे देवाची उपासना करण्याची गरज. ही गरज पूर्ण केल्याने आपले जीवन अर्थपूर्ण कसे बनते हे या मासिकात समजावून सांगितले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
तरुण व्यक्ती भेटल्यास तुम्ही म्हणू शकता: “अनेक तरुणांना कधीकधी खूप एकटे किंवा आपली कोणीच पर्वा करत नाही असे वाटते. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? [उत्तरासाठी थांबा आणि मग नीतिसूत्रे १५:१३ वाचा.] एकटेपणा खरोखरच खायला उठू शकतो. एकटेपणाच्या भावनांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो, याबाबतीत या लेखात अतिशय उत्तम सूचना दिल्या आहेत.” पृष्ठ १२ वरील लेख दाखवा.
टेहळणी बुरूज जाने.-मार्च
“पुष्कळ लोक, देवाचे राज्य यावे म्हणून प्रार्थना करतात. उदाहरणार्थ, येशूने आपल्या अनुयायांना शिकवलेली सर्वांच्या परिचयाची ही प्रार्थना पाहा. [मत्तय ६:९, १० वाचा.] हे राज्य काय आहे आणि ते केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत आहे का? [उत्तर ऐका.] बायबल याबाबतीत काय म्हणते ते या मासिकात सांगितले आहे.”