वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १२/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“आपल्या सभोवार गुन्हेगारी वाढत असल्याचे आपण पाहत आहोत आणि आपल्या जीवनावर तिचा खूप परिणाम पडत आहे. याचे कारण काय आहे, तुम्हाला माहीत आहे का? [२ तीमथ्य ३:१, ३ वाचा.] संपूर्ण जगातील गुन्हेगारीचे प्रमाण याचा पुरावा देते, की आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत. पोलीस नसते तर परिस्थिती किती बिकट झाली असती! सावध राहा! याच्या या अंकात, विश्‍वभरातील पोलिसांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याची चर्चा करण्यात आली आहे.”

टेहळणी बुरूज डिसें. १५

“वर्षाच्या या कालावधीत, पुष्कळ लोक येशूच्या जन्माचा विचार करतात. त्याच्या जन्माबद्दल बायबलमध्ये असलेल्या अहवालातून आपण मौल्यवान धडे शिकू शकतो हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तरासाठी थांबा. मग, पृष्ठ ५ उघडून २ तीमथ्य ३:१६ वाचा.] टेहळणी बुरूजच्या या अंकात काही धड्यांची चर्चा करण्यात आली आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“पुष्कळ लोक पोर्नोग्राफीकडे केवळ मौज किंवा थोडासा बदल अशा दृष्टीने पाहतात. परंतु काहींना वाटते, की हे लोकांसाठी, कुटुंबांसाठी आणि समाजासाठी हानीकारक आहे. सावध राहा! याच्या या अंकात [पृष्ठ १९ दाखवा] पोर्नोग्राफीचे बायबल तत्त्वांच्या प्रकाशात परीक्षण केले आहे.” उदाहरण म्हणून, इफिसकर ४:१७-१९ वाचा.

टेहळणी बुरूज जाने. १

“एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो किंवा प्रिय व्यक्‍ती गंभीर आजाराने पीडित होते तेव्हा लोक सहसा असा विचार करू लागतात, की ‘देवाने असे का होऊ दिले?’ तुमच्याही मनात कदाचित असा प्रश्‍न कधीतरी आला असेल. परंतु बायबल दाखवते, की ज्यांना दुःख सहन करावे लागते त्यांच्याबद्दल देवाला कळवळा वाटतो. [यशया ६३:९अ वाचा.] देव दुःखाचा अंत करील अशी खात्री आपण का बाळगू शकतो याचे स्पष्टीकरण या मासिकात दिले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा