मासिके कशी सादर कराल?
टेहळणी बुरूज डिसें.१५
“वर्षाच्या या महिन्यात संपूर्ण जगभरातील लोक, वेगवेगळ्या प्रकारे येशूच्या जन्माची आठवण करतात. बायबल भविष्यवाणी, येशूच्या जन्माचा संबंध चिरकाल शांतीशी जोडते, हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐका. मग यशया ९:६, ७ वाचा.] ही शांती कशी साध्य केली जाणार आहे हे या नियतकालिकात सांगितले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“बहुतेकांना वाटतं, की आपण भेदभाव बाळगत नाही, पण तुम्हाला काय वाटतं, खरोखरच असा कोणी आहे का, की जो निःपक्षपाती आहे? [उत्तर ऐका. आणि मग पृष्ठ ११ वरील चौकोन दाखवा. त्यातील काही मुद्द्यांवर जोर दिल्यानंतर त्याच पृष्ठावरील दुसऱ्या परिच्छेदाकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करा.] सावध राहाच्या! या अंकात, भेदभावाची पाळेमुळे काय आहेत आणि आपण त्याच्यावर कशाप्रकारे मात करू शकतो, ते सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज जाने.१
“आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे, अशी बऱ्याच धर्मांची शिकवण आहे. [मत्तय २२:३९ वाचा.] मग, धर्माच्या नावावर इतकी युद्धे आणि लढाया का होतात, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] टेहळणी बुरूजच्या या अंकात, धर्म मानवजातीत कधी ऐक्य आणील का, या प्रश्नावर परीक्षण करण्यात आले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“बालवयापासूनच मुलांना शिक्षण देण्याचं महत्त्व पुष्कळ लोकांना वाटत आहे. आज याची गरज आहे, असे तुम्हाला वाटतें का? [उत्तर ऐकल्यानंतर नीतिसूत्रे २२:६ वाचा.] सावध राहाच्या! या अंकात, आपली मुले धार्मिक व यशस्वी प्रौढ होण्याकरता पालक आपल्या मुलांसाठी काही विशिष्ट गोष्टी करू शकतात, याची चर्चा करण्यात आली आहे.”