वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०७ पृ. ६
  • भग्न हृदयी जनांस सांत्वन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भग्न हृदयी जनांस सांत्वन
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • दुःखी जनांना सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देव आपलं सांत्वन कसं करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • सांत्वन व प्रोत्साहन पैलूदार रत्ने
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १२/०७ पृ. ६

भग्न हृदयी जनांस सांत्वन

१ मानवजातीच्या इतिहासात पूर्वी कधीही इतक्या सांत्वनाची आवश्‍यकता नव्हती जितकी आज आहे. आपला राजा येशू ख्रिस्त याच्याप्रमाणे आपणही ‘भग्न हृदयी जनास पट्टी बांधतो.’—यश. ६१:१.

२ सांत्वन देण्याची पद्धत: आपला संदेश संतुलित व सकारात्मक असला तरच लोकांना त्यातून सांत्वन मिळू शकते. लोकांबरोबर बोलताना आपण जगात चाललेल्या वाईट गोष्टी आणि खोटे सिद्धांत यांवर जास्त बोलत बसण्यापेक्षा शास्त्रवचनांतील सत्ये आणि देवाच्या सांत्वनदायक अभिवचनांच्या उज्जवल आशेविषयी अधिक बोलले पाहिजे. याचा अर्थ आपण हर्मगिद्दोनाविषयी बोलूच नये असे नाही. आपल्याला, ‘परमेश्‍वराच्या प्रसादाच्या वर्षाची व देवाच्या सूड घेण्याच्या दिवसाची’ घोषणा करण्याची व ‘पातक्याला त्याच्या कुमार्गाविषयी बजावण्याची’ कामगिरी मिळाली आहे. परंतु, हर्मगिद्दोनाचा इशारा आणि त्याच्या भयानक परिणामांचे वर्णन यांच्यामुळे, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचे महत्त्व कमी होता कामा नये.—यश. ६१:२; यहे. ३:१८; मत्त. २४:१४.

३ घरोघरी: आज आपण सर्रासपणे अशा लोकांना भेटतो जे आजारपणामुळे, प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे, अन्यायामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे निराश झालेले आहेत. ख्रिस्ताचे अनुकरण करत असल्यामुळे आपल्याला त्यांचा “कळवळा” येतो व सेवेत भेटणाऱ्‍या लोकांना आपण सहानुभूती दाखवतो. (लूक ७:१३; रोम. १२:१५) लोक तोंड देत असलेल्या समस्येशी संबंधित आपण एखाद-दोन शास्त्रवचने त्यांना वाचून दाखवत असलो तरी आपण, “ऐकावयास तत्पर,” असले पाहिजे; म्हणजेच समोरच्या व्यक्‍तीला आपल्या भावना व्यक्‍त करण्यास वाव दिला पाहिजे. (याको. १:१९) तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतरच आपण तिला सांत्वन देऊ शकू.

४ संभाषणादरम्यान उचित प्रसंगी आपण म्हणू शकतो: “मी तुम्हाला बायबलमधून काही प्रोत्साहनदायक शब्द वाचून दाखवू इच्छितो.” घरमालक आपले विचार व्यक्‍त करत असताना आपण समंजसपणा दाखवला पाहिजे; तो व्यक्‍त करत असलेल्या प्रत्येक चुकीच्या दृष्टिकोनात सुधार करण्याचा मोह आपण आवरला पाहिजे. याऐवजी, घरमालकाला शास्त्रवचनांतून प्रोत्साहन व सांत्वन कसे देता येईल, त्याच्या मनास उभारी कशी देता येईल, यावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले पाहिजे. याबाबतीत तुम्ही रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स पुस्तकाच्या पृष्ठे ११७-१२१ वर, “उत्तेजन” या मथळ्याखालील माहितीतून काही मुद्द्‌यांचा उपयोग करू शकता. किंवा, घरमालकाला नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन ही पत्रिका देऊन त्यातील उत्तेजनदायक माहितीची चर्चा करू शकता.

५ इतरांना सांत्वन देण्याच्या संधी शोधा: तुम्ही कोणा शेजाऱ्‍याला, तुमच्याबरोबर काम करणाऱ्‍या सहकर्मीला, शाळासोबत्याला किंवा कुटुंबातील सदस्याला ओळखता का ज्याला सांत्वनाची गरज आहे? अशा लोकांच्या घरी जाऊन त्यांना शास्त्रवचनांतून सांत्वन देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्यांना सांत्वन देण्याची गरज का आहे, हे कळल्यावर तुम्ही त्या विशिष्ट परिस्थितीनुसार तयारी करून जाऊ शकता. याबाबतीत काहींनी पत्रे लिहिली आहेत किंवा त्यांना फोन केला आहे. शेजाऱ्‍यांबद्दलचे खरे प्रेम आपल्याला त्यांना सहानुभूती दाखवण्यास व शास्त्रवचनांतून आवश्‍यक ते सांत्वन देण्यास प्रवृत्त करेल.—लूक १०:२५-२७.

६ जे शोक करतात त्यांना सांत्वन देण्याची, दुःखी लोकांचा आनंद खुलवण्याची आणि त्यांच्यामध्ये उज्जवल भविष्याची आशा जागी करण्याची कामगिरी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. जगातील लोकांना अशाप्रकारच्या सांत्वनाची गरज आहे. देवाने वचन दिलेल्या अनेक उत्कृष्ट गोष्टींबद्दल भरभरून बोलल्याने, जे प्रांजळ मनाचे लोक आहेत त्यांना सांत्वन व आशा मिळेल. आपल्याला, भग्न हृदयी जनास पट्टी बांधायची गरज आहे, ही गोष्ट आपण सतत आपल्या लक्षात ठेवली पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा