२००८ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१. (क) पौलाने इब्री ख्रिश्चनांना दिलेला सल्ला आज विशेष महत्त्वाचा का आहे? (इब्री १०:२४; २५ वाचा.) (ख) पौलाने दिलेला सल्ला लागू करण्याची आपल्याला लवकरच कोणती संधी मिळणार आहे?
१ प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना, तो दिवस जसजसा जवळ येतो तसतसे एकत्र मिळणे व एक दुसऱ्यास उत्तेजन देणे “अधिक” करावे असे आर्जवले. (इब्री १०:२४, २५) पौल ज्या दिवसाविषयी बोलत होता “तो दिवस” अगदी जवळ येऊन ठेपल्याचा भरपूर पुरावा आपण पाहतो. म्हणूनच, आध्यात्मिक शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या भाऊबहिणींसोबत एकत्र येण्याच्या संधींची आपण वाट पाहत असतो. हे शिक्षण आपल्याला अतिशय बिकट होत चाललेल्या या ‘शेवटल्या काळात’ टिकून राहण्यासाठी साहाय्य करते. (२ तीम. ३:१) अशीच एक संधी आपल्याला २००८ प्रांतीय अधिवेशनांतून मिळणार आहे.
२. (क) अधिवेशनात तिन्ही दिवस हजर राहणे का महत्त्वाचे आहे? (ख) अधिवेशनाला हजर राहण्यासाठी आपण कशा प्रकारे तयारीला लागू शकतो?
२ तिन्ही दिवस हजर राहा: तिन्ही दिवस हजर राहण्यासाठी आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. ‘एकत्र मिळणे न सोडल्यास’ आपण आवश्यक असलेले आध्यात्मिक भोजन घेण्यास चुकणार नाही. (इब्री १०:२५) म्हणून लवकरात लवकर तयारीला लागा. तुमच्या मालकाला आधीच कळवल्याने, तो आवश्यक असल्यास त्याप्रमाणे योजना करेल. तुमची शाळेत जाणारी मुले असल्यास, तुमच्या योजनांविषयी त्यांच्या शिक्षकांना कळवा. अधिवेशनास हजर राहणे हे तुमच्या उपासनेचा नियमित भाग आहे असे त्यांना सांगा. राज्याशी संबंधित कार्यांना पहिल्या स्थानी ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल याची तुम्ही खात्री बाळगू शकता.—मत्त. ६:३३.
३. आपण कशा प्रकारे इतरांच्या गरजांकडे लक्ष देऊ शकतो?
३ हजर राहण्यासाठी इतरांना मदत करा: “एकमेकांकडे लक्ष” देण्याचीही पौलाने आपल्या बांधवांना विनंती केली. (इब्री १०:२४) अधिवेशनाला हजर राहण्यासाठी तुमच्या पुस्तक अभ्यास गटातील भाऊबहिणींना मदतीची गरज आहे का? तुमचे बायबल विद्यार्थी एका दिवसासाठी का होईना हजर राहणार असतील, तर तुम्ही त्यांना अधिवेशनाचा लाभ घेण्यास मदत करू शकता का? अधिवेशनाला हजर राहण्याच्या आपल्या योजनेविषयी सत्यात नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना सांगा आणि त्यांना देखील आपल्यासोबत येण्यास आमंत्रित करा. तुमच्या अशा प्रेमळ प्रयत्नांमुळे तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद मिळू शकतील.
४. प्रांतीय अधिवेशनाच्या तारखा व ठिकाणे यांविषयीची माहिती आपण कशी मिळवू शकतो?
४ अधिवेशनासंबंधी विचारपूस: अधिवेशन कधी व कोठे असणार याविषयी विचारपूस करण्यासाठी दरवर्षी पुष्कळ लोक शाखा दफ्तराला फोन करतात. फोन करणारे जवळजवळ सगळेच जण, आपल्या बांधवांपैकी असतात. त्यांना खरे तर ही माहिती आधीपासूनच मिळालेली असते. तेव्हा, शाखा दफ्तराला फोन करण्याआधी कृपया, आमची राज्य सेवा यात प्रकाशित झालेली यादी पाहावी.
५. आपल्या मंडळीला नेमलेल्या अधिवेशनाऐवजी आपण दुसऱ्या ठिकाणी अधिवेशनाला जाणार असल्यास राहण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती आपण कशा प्रकारे मिळवू शकतो?
५ तुमच्या मंडळीला नेमलेल्या अधिवेशनाऐवजी तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी अधिवेशनाला जाणार असाल, तर राहण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अधिवेशनाच्या मुख्यालयाला पत्र लिहू शकता. अधिवेशनाच्या मुख्यालयालांची यादी आमची राज्य सेवा यात लवकरच प्रकाशित केली जाईल. पत्राचे उत्तर मिळण्यासाठी, पोस्टाचे योग्य तिकीट लावून, स्वतःचे नाव व पत्ता लिहिलेला लिफाफा पाठवावा.
६. स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट या अर्जाविषयी कोणत्या सूचना लक्षात ठेवाव्यात?
६ विशेष गरजा: एखाद्या प्रचारकाला अधिवेशनाच्या शहरात मुक्कामाच्या संबंधाने साहाय्य हवे असल्यास, हा प्रचारक स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट नावाचा अर्ज भरण्यास योग्य आहे का हे मंडळीच्या सेवा समितीने ठरवावे. हा अर्ज मंडळीच्या सचिवाने अधिवेशनाच्या रूमिंग डिपार्टमेंटला पाठवण्याआधी, अर्जावर दिलेल्या सूचना आणि सर्व वडिलांना पाठवण्यात आलेल्या फेब्रुवारी १४, २००७ तारखेच्या पत्रातील माहितीचे परीक्षण करावे.
७. रूमिंगसंबंधी करण्यात आलेल्या व्यवस्थेला आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकतो? (“हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना” हा चौकोन पाहावा.)
७ रूम बुक करणे: उपलब्ध हॉटेल्सची यादी अधिवेशनाच्या खूप आधी राज्य सभागृहातील सूचना फलकावर लावली जाईल. हॉटेलमध्ये रूम बुक करण्याआधी “हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना” आणि “हॉटेलचे बुकिंग असे करावे” या चौकोनांतील सूचनांचे परीक्षण करावे. यादीतील हॉटेल्समध्ये, सांगितलेल्या दरापेक्षा जास्त दराने रूम बुक करण्याऐवजी किंवा यादीत समावेश नसलेल्या हॉटेलशी संपर्क साधण्याऐवजी, मंडळीला हॉटेल्सची नवीन यादी येईपर्यंत थांबावे.
८. (क) अधिवेशनाच्या ठिकाणी आपण कशा प्रकारे यहोवाचे गौरव करू शकतो? (ख) यहोवाच्या लोकांची कशा प्रकारे प्रशंसा करण्यात आली?
८. चांगली कार्ये: उपासनेकरता एकत्र मिळण्याविषयी यहोवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करणे, आपल्याकरता तर “हितकारक” ठरतेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे यामुळे यहोवाच्या नावाचे गौरव होते. (यश. ४८:१७) प्रांतीय अधिवेशनाच्या ठिकाणी पुष्कळ लोकांना आपली ‘चांगली कृत्ये उघडपणे’ दिसून येतात आणि ही चांगली कार्ये पाहून बऱ्याच जणांनी प्रशंसाही व्यक्त केली आहे. (१ तीम. ५:२५) अनेक वर्षांपासून आपली अधिवेशने होत आहेत अशा एका शहरातील एका सभागृहाच्या मॅनेजरने असे म्हटले: “अधिवेशनाला आलेले प्रतिनिधी अतिशय शांत व सुस्वभावी होते. त्यांनी सभागृह व आसपासचा परिसर अतिशय स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवला.” दुसऱ्या एका शहरात, सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या अधिवेशनाच्या प्रतिनिधींच्या चांगल्या आचरणाने प्रभावित होऊन सभागृहाच्या भाड्यात २५% सूट दिली. इतर पंथांतील व मनोरंजन क्षेत्रातील लोकांसोबत व्यवहार करताना आलेल्या समस्यांविषयी सांगितल्यावर, एका हॉटेल मॅनेजरने त्यांच्या हॉटेलात राहिलेल्या आपल्या बांधवांच्या सहयोगी व सहनशील वृत्तीची प्रशंसा केली. त्याने म्हटले: “आमच्या हॉटेलात येणारे सगळेच यहोवाचे साक्षीदार असते, तर किती बरं झालं असतं!” आपल्या बांधवांच्या चांगल्या आचरणामुळेच अशा प्रकारचे प्रशंसेचे उद्गार ऐकायला मिळतात आणि त्यामुळे नक्कीच यहोवाचे मनही आनंदाने प्रफुल्लित होत असेल!
९. अधिवेशनातील प्रत्येक भाग लक्षपूर्वक ऐकणे किती महत्त्वाचे आहे, हे मत्तय ४:४ यातून कसे दिसते?
९. आपले जीवन, ‘परमेश्वराच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचन’ ऐकण्यावर अवलंबून आहे असे येशूने म्हटले होते. (मत्त. ४:४) दरवर्षी होणाऱ्या आपल्या अधिवेशनांत यहोवा आपल्याला ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ तयार केलेले आध्यात्मिक भोजन “यथाकाळी खावयास” देतो. (मत्त. २४:४५) ही आध्यात्मिक मेजवानी तयार करण्यासाठी आणि आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी बरीच मेहनत घेतली जाते. म्हणून अधिवेशनाच्या प्रत्येक भागाला हजर राहून आणि लक्षपूर्वक ऐकून, आपण यहोवाच्या प्रेमळ काळजीबद्दल कृतज्ञता दाखवू या.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाच्या वेळा:
शुक्रवार व शनिवार
सका. ९:२० ते संध्या. ४:५५
रविवार
सका. ९:२० - संध्या. ४:००
[४ पानांवरील चौकट]
हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना:
▪ एप्रिल ७, २००८ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील सेवा सभेनंतरच रूम बुक करण्यासाठी हॉटेलशी संपर्क साधावा.
▪ शक्यतो एप्रिल महिन्यातच हॉटेलचे बुकिंग करावे. कृपया, ऑनलाईन बुकिंग करू नये, कारण आपण ही पद्धत वापरण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही.
▪ केवळ यादीत सुचवलेल्या हॉटेल्समध्येच रूम बुक करावी.
▪ यादीत दाखवलेल्या दरापेक्षा जास्त दराने रूम बुक करू नये.
▪ जी व्यक्ती राहणार आहे त्याच व्यक्तीच्या नावाने प्रत्येक रूम बुक करावी.
▪ एका रूममध्ये एकूण किती प्रौढ व्यक्ती राहू शकतात हे यादीत दाखवलेले असेल. कृपया यासंबंधी हॉटेलच्या नियमांचे पालन करावे.
▪ एकदा बुकिंग केल्यावर ते बदलू नये.—मत्त. ५:३७.
▪ यादीत समाविष्ट नसलेल्या हॉटेल्सशी संपर्क साधून आपल्या अधिवेशनाकरता खास दराने रूम उपलब्ध असण्याविषयी चौकशी करू नये.
▪ यादीतील सर्व हॉटेल्सशी संपर्क साधूनही रूम न मिळाल्यास, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करताना काही समस्या आल्यास मंडळीच्या सचिवांना याविषयी कळवावे. सचिवांनी यादीच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीच्या साहाय्याने अधिवेशनाच्या रूमिंग विभागाशी संपर्क साधावा.
▪ बुकिंग रद्द करायचेच झाल्यास ते लवकरात लवकर करावे. रद्द केल्याची माहिती हॉटेलकडून न चुकता मिळवावी.
हॉटेलचे बुकिंग असे करावे:
१. यादीतील फोन नंबरवर हॉटेलला कामाच्या वेळादरम्यान फोन करा.
२. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहात याचा उल्लेख करा.
३. तुम्ही हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला येणार व कोणत्या तारखेला रूम सोडणार ते स्पष्ट सांगा.
४. त्या हॉटेलमधील सर्व रूम बुक झाल्या असतील तर यादीत सांगितलेल्या दुसऱ्या हॉटेलला फोन करा.
५. रूम बुक करून कन्फरमेशन मागा.
६. रूमच्या डिपॉझिटची रक्कम दहा दिवसांच्या आत क्रेडिट कार्डने, चेकने किंवा मनी ऑर्डरने पाठवा. रोख रक्कम कधीही पाठवू नका. चेकने किंवा मनी ऑर्डरने डिपॉझिटचे पैसे पाठवले असतील तर त्यावर कन्फरमेशनची माहिती लिहा.