वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०७ पृ. ८
  • येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • नम्र लोकांना देवाच्या मार्गात चालण्यास शिकवा
    आमची राज्य सेवा—२००६
  • ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तरुणांनो, सभांचा पुरेपूर फायदा करून घ्या
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ९/०७ पृ. ८

येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा

१. येशूने कशाप्रकारचे उदाहरण ठेवले?

१ शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभाग घेताना आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे, की जे आपले निरीक्षण करत असतात त्यांच्यावर आपल्या वागणुकीचा जोरदार प्रभाव पडतो. येशूने केवळ आपल्या शब्दांनीच नव्हे तर कृतींनी शिकवले. त्याचे निरीक्षण करणारे त्याचा आवेश, लोकांबद्दल त्याला वाटणारे प्रेम, आपल्या पित्याच्या नावाचे दोषनिवारण करण्याची त्याची उत्कट इच्छा आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा त्याचा दृढसंकल्प पाहू शकत होते.—१ पेत्र २:२१.

२. आपल्यासोबत सेवाकार्य करणाऱ्‍यांवर आपल्या उदाहरणाचा कसा प्रभाव पडू शकतो?

२ घरोघरच्या सेवाकार्यात: येशूप्रमाणेच आपल्याही उदाहरणाचा आपल्यासोबत कार्य करणाऱ्‍यांवर प्रभाव पडतो. आपण आवेशाने सेवाकार्यात सहभाग घेतो तेव्हा नवीन व कमी अनुभव असलेले प्रचारक स्वतःच्या सेवाकार्याची गुणवत्ता पडताळून पाहण्यास प्रेरित होऊ शकतात. आपण किती आनंदाने सेवेत सहभाग घेतो, इतरांबद्दल किती प्रामाणिक आस्था बाळगतो हे पाहिल्यावर त्यांनाही या गुणांचे क्षेत्र सेवाकार्यात अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल. आपण प्रयत्नपूर्वक घरमालकाला शास्त्रवचने उघडून दाखवतो, तसेच पुनर्भेटी घेण्यासाठी व बायबल अभ्यास चालवण्यासाठी परिश्रम घेतो हे पाहून त्यांनाही असे करण्याची प्रेरणा मिळेल.

३. आपल्या उदाहरणावरून बायबल विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळू शकते?

३ बायबल अभ्यास चालवताना: विशेषतः आपले बायबल विद्यार्थी आपल्या वागणुकीचे निरीक्षण करतात. उदाहरणार्थ, अभ्यासाकरता पूर्वतयारी करण्याचे, शास्त्रवचने उघडून बघण्याचे व महत्त्वाच्या मुद्द्‌यांना अधोरेखित करण्याचे महत्त्व कदाचित आपण त्यांना समजावून सांगितले असेल. तरीही आपण स्वतः तयारी केली आहे किंवा नाही हे त्यांच्या लक्षात येईल. (रोम. २:२१) आपण अभ्यासाकरता वेळेवर येत असल्यास, ते देखील बायबल अभ्यासाच्या वेळेत इतर कामे येऊ देणार नाहीत. तसेच सेवाकार्याकरता आपली आत्मत्यागी वृत्ती व आपला दृढ विश्‍वास देखील त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. येशूचे काळजीपूर्वक अनुकरण करणाऱ्‍यांचे विद्यार्थी सहसा आवेशी व फलदायी सुवार्तिक बनतात यात काही आश्‍चर्य नाही.

४. मंडळीच्या सभांमध्ये आपल्या उदाहरणाद्वारे इतरांना काय शिकायला मिळू शकते?

४ मंडळीच्या सभांना उपस्थित राहताना: ख्रिस्ती मंडळीच्या सर्व सदस्यांवर मंडळीच्या सभांमध्ये आपल्या उदाहरणाद्वारे नव्या व्यक्‍तींना शिकवण्याची जबाबदारी आहे. जे आस्थेवाईक लोक मंडळीच्या सभांना येऊ लागतात त्यांना मंडळीतील चांगल्या उदाहरणांकडे पाहून बराच लाभ होतो. ते मंडळीतील बांधवांमध्ये असणारे प्रेम, ख्रिस्ती एकता तसेच त्यांचा शालीन पेहराव पाहतील. (स्तो. १३३:१) मंडळीच्या सर्व सभांना आपण विश्‍वासूपणे उपस्थित राहतो आणि सभेत आपल्या उत्तरांद्वारे आपण कशाप्रकारे आपला विश्‍वास जाहीरपणे व्यक्‍त करतो हे देखील ते पाहतील. आपल्या एका सभेला आलेल्या एका व्यक्‍तीने असे निरीक्षण केले की एका लहानशा मुलीने वक्‍त्‌याने सांगितलेले शास्त्रवचन आपल्या बायबलमधून काही क्षणातच उघडले आणि ते वाचले जात असताना ती लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या उदाहरणाने या व्यक्‍तीला बायबल अभ्यासाची विनंती करण्यास प्रवृत्त केले.

५. आपल्या उदाहरणाचे महत्त्व आपण कधीही क्षुल्लक का लेखू नये?

५ बायबल आपल्याला एकमेकांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देते. (फिलि. ३:१७; इब्री १३:७) म्हणूनच आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की जर आपण येशूच्या उदाहरणाचे काळजीपूर्वक अनुकरण केले तर हे इतरांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या जीवनावरही याचा चांगला प्रभाव पडेल. याची जाणीव बाळगून आपण १ तीमथ्य ४:१६ यातील शब्दांचे पालन करू या: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा