मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑग. १
“येशूच्या या शब्दांवर मला तुमचे मत हवे होते. [मत्तय ५:३ वाचा.] आनंद मिळण्यासाठी अध्यात्माची खरोखरच गरज आहे का? [उत्तर ऐका.] खरे अध्यात्म काय आहे आणि ते आपण कसे प्राप्त करू शकतो यावर बायबलचे काय म्हणणे आहे ते या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“जगाच्या बहुतेक भागात लोकांना असे वाटू लागले आहे, की नैतिक स्तरे ढासळत चालली आहेत. तुम्हालाही असे वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] आपण आज पाहत असलेली परिस्थिती एक प्राचीन भविष्यवाणी पूर्ण करते. [२ तीमथ्य ३:२-४ वाचा.] नैतिकता ढासळण्याचा काय अर्थ होतो आणि यामुळे मानवजात कुठे चालली आहे हे या मासिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज सप्टें. १
“मला यावर तुमचे मत हवे होते. [इब्री लोकांस ३:४ वाचा.] या विश्वाचा एक बुद्धिमान रचनाकार आहे, याजशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तर ऐकून घ्या.] रचनाकारावर विश्वास करणे हे खऱ्या विज्ञानाशी जुळते का, याचे परीक्षण या मासिकात करण्यात आले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“पैशांची गरज सर्वांनाच असते. पण कधीकधी माणूस पैसा कमवण्याविषयी नको तितकी काळजी करतो असे तुम्हाला वाटत नाही का? [उत्तर ऐकून घ्या.] पैशाच्या मागे लागल्यामुळे काय परिणाम होतो याविषयी यात काय म्हटले आहे पाहा. [१ तीमथ्य ६:१० वाचा.] साधे राहणीमान ठेवून कमी पैशातही आपण कसा उदरनिर्वाह करू शकतो याविषयी या नियतकालिकात काही व्यवहारोपयोगी सूचना दिल्या आहेत.”