टेहळणी बुरूजचे नवे रूप!
१ काही महिन्यांपूर्वी मंडळ्यांना एक रोमांचक घोषणा ऐकायला मिळाली: जानेवारी २००८ पासून टेहळणी बुरूजच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित होतील. एक सर्वसामान्य जनतेकरता आणि दुसरी आपल्या ख्रिस्ती बांधवांकरता! कदाचित तुम्ही विचार करत असाल, की ‘या दोन आवृत्तींमध्ये कोणते फरक असतील? वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित करण्याचे फायदे कोणते? काही नवीन सदर सुरू केले जातील का? निरनिराळ्या भारतीय भाषांतून यांपैकी कोणत्या आवृत्तीं प्रकाशित केल्या जातील?’
२ दोन्ही आवृत्तींतील फरक: इंग्रजीत, महिन्याच्या १ तारखेचा अंक सार्वजनिक जनतेकरता असेल. या अंकातील सर्व लेख सार्वजनिक जनतेला मनात ठेवून तयार केले जातील. महिन्याच्या १५ तारखेचा अंक अभ्यासाची आवृत्ती असेल. हा अंक क्षेत्र सेवाकार्यात लोकांना दिला जाणार नाही. यात एका महिन्याकरता आवश्यक असलेले सर्व अभ्यास लेख तसेच खास समर्पित ख्रिश्चनांकरता लाभदायक असणारे अतिरिक्त लेखही असतील. सार्वजनिक जनतेकरता असलेला टेहळणी बुरूजचा अंक साक्षीदारांच्या उपयोगाचा तर असेलच पण विशेषतः तो साक्षीदार नसलेल्या पण बायबलचा आदर करणाऱ्या लोकांना रुचेल. दुसरीकडे पाहता, सावध राहा! पूर्वीप्रमाणेच मोठ्या वाचकवर्गाला लक्षात ठेवून तयार केले जाईल. यात अशा लोकांचा समावेश आहे की ज्यांना देवाधर्मात तितकी आस्था नाही किंवा जे ख्रिस्ती नाहीत.
३ फायदे: अभ्यासाच्या आवृत्तीत, साक्षीदार नसलेल्या लोकांना समजणार नाहीत अशा शब्दांचे स्पष्टीकरण देण्याची गरज उरणार नाही. उदाहरणार्थ “पायनियर” व यासारखे इतर शब्द. तसेच या लेखात खास यहोवाच्या साक्षीदारांना व चांगली आध्यात्मिक प्रगती करत असलेल्या बायबल विद्यार्थ्यांना समर्पक असलेली माहिती प्रकाशित करता येईल. सार्वजनिक जनतेकरता असलेल्या आवृत्तीबद्दल काय? या आवृत्तीतील विषय व लेखन शैली लोकांना मनात ठेवून निवडली जाईल. त्यामुळे साक्षीदार नसलेली व्यक्ती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मासिक बिनदिक्कत वाचू शकेल. अर्थात, प्रत्येक यहोवाच्या साक्षीदाराकरता प्रत्येक अंक वाचणे फायदेशीर ठरेल.
४ काही नवीन सदर: टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक जनतेकरता असलेल्या आवृत्तीत काही रोमांचक नवीन सदर समाविष्ट केले जात आहेत. यांपैकी एका सदरात बायबलमधील मूलभूत शिकवणुकींची अगदी साध्या सोप्या पद्धतीने चर्चा केली जाईल. दुसऱ्या एका सदरात बायबलमधील माहिती कुटुंबांकरता कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते हे दाखवले जाईल. लहान मुलांकरता बायबल अभ्यासाचे प्रकल्प सुचवले जातील. प्रत्येक अंकातील एक लेख, बायबलमधील विशिष्ट उतारे यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला काय शिकवतात यावर प्रकाश टाकणारा असेल.
५ भारतीय भाषा: पुढील भाषांतून अभ्यास लेखांची मासिक आवृत्ती आणि सार्वजनिक जनतेकरता त्रैमासिक आवृत्ती प्रकाशित केली जाईल: कन्नड, तामीळ, तेलगू, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, व हिंदी. पण गुजराती, मिझो व नेपाळी भाषांतून फक्त संयुक्त मासिक आवृत्ती प्रकाशित केली जाईल. ही आवृत्ती महिन्याच्या १ तारखेची असेल आणि यात अभ्यास लेखांच्या आवृत्तीतील सर्व लेख तसेच सार्वजनिक जनतेकरता असलेल्या आवृत्तीतील निवडक लेख असतील. डिसेंबर १५, २००७ इंग्रजी अंकातील जे अभ्यास लेख प्रकाशित करण्याचे राहून जातील ते त्या त्या भाषेत माहितीपत्रकाच्या रूपात प्रकाशित केले जातील.
६ टेहळणी बुरूज मासिकासंबंधी या नव्या व्यवस्थेवर यहोवाचा आशीर्वाद असो हीच आमची प्रार्थना आहे. सावध राहाच्या! जोडीने हे मासिकसुद्धा आणखी अनेक योग्य मनोवृत्तीच्या लोकांपर्यंत सुवार्ता पोचवील अशी आशा करूया.—मत्त. १०:११.