सेवा सभा आराखडा
सप्टेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
५ मि: स्थानीय घोषणा.
२० मि: “इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!” आमची राज्य सेवा नोव्हेंबर १९९९ अंकातील १०-१८ व २७-३६ परिच्छेदांवर आधारित प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा. हा भाग एखाद्या सुयोग्य वडिलाने हाताळावा. परिच्छेद १२, १३ व १८ वाचावेत.
२० मि: “येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा.”a इतरांच्या चांगल्या उदाहरणामुळे आपल्याला कसा फायदा झाला याविषयी सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करावे.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १७ (१८७)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, सप्टेंबर १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रात्यक्षिकांत कोणतेही एक मासिक सादर करण्यात आले तरीसुद्धा घरमालकाला मासिके देताना दोन्ही मासिकांचा संच दिला जावा.
१५ मि: मागच्या वर्षी आपण केलेल्या कार्याचा आढावा. सेवा पर्यवेक्षकांनी मागील सेवा वर्षाच्या कार्याची उजळणी करावी व सेवाकार्यात साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. योग्य मुद्द्यांवर सर्वांची प्रशंसा करावी. येणाऱ्या सेवा वर्षात लक्ष देण्याजोग्या एक किंवा दोन गोष्टींचा उल्लेख करावा. पायनियरांच्या कार्यावर टिप्पणी करावी व त्यांच्या उत्तम कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी. अक्रियाशील व्यक्तींना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कोणते चांगले परिणाम घडून आले याविषयी सांगावे.
२० मि: एकजूट असलेला बंधुसमाज. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १८ (१६२)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा.
१५ मि: प्रश्न पेटी. हा भाग वडिलांनी श्रोत्यांसोबत चर्चेच्या रूपात हाताळावा. पुरेसा वेळ असल्यास, उल्लेख केलेली शास्त्रवचने वाचून त्यांवर चर्चा करावी.
२० मि: बायबलविषयीची माहिती या पत्रिकेचा वापर करून ऑक्टोबर महिन्यात बायबल अभ्यास सुरू करा. ऑक्टोबर महिन्यात आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! ही मासिके सादर करणार आहोत. आस्था दाखवणाऱ्या घरमालकांसोबत बायबलविषयीची माहिती या पत्रिकेतून बायबल अभ्यास सुरू करता येईल. उपलब्ध असल्यास, या पत्रिकेची एक प्रत सभेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला परिचारकांनी द्यावी. मग पत्रिकेतील माहितीवर थोडक्यात चर्चा करावी. पहिल्या भेटीतच किंवा पुनर्भेट करताना या पत्रिकेतील सर्व माहितीची अथवा थोडक्यात घरमालकासोबत चर्चा करू शकता हे श्रोत्यांना सांगावे. पृष्ठ ८ वर दिलेल्या सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता योग्य असलेल्या वेगळ्या सादरतेचा उपयोग करून टेहळणी बुरूज ऑक्टोबर १ व सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर हे अंक कसे सादर करता येतील हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे. एका प्रात्यक्षिकात, मासिके घेण्यास नकार देणाऱ्या घरमालकाला प्रचारक पत्रिका देतो असे दाखवावे. दुसऱ्या प्रात्यक्षिकात, घरमालकाने मासिके स्वीकारल्यानंतर प्रचारक त्याला पत्रिका देतो, पृष्ठ ५ वर त्याच्याशी चर्चा करतो, बायबल काय शिकवते या पुस्तकातील विषय दाखवतो आणि हे पुस्तक बायबल अभ्यासाकरता तयार करण्यात आल्याचे सांगून पुस्तक सादर करतो.
गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातून काही निवडक घोषणा. प्रचारकांना सप्टेंबर महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि: शाखा दप्तराचे पत्र. आमची राज्य सेवा याच्या सदर अंकातील पहिल्या पृष्ठावर दिलेल्या शाखा दप्तराच्या पत्रावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. मागच्या वर्षी “मुक्तिसमय निकट आहे” या प्रांतीय अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका देण्याच्या मोहिमेत किंवा या वर्षी स्मारकविधीची निमंत्रण पत्रिका वितरीत करण्याच्या मोहिमेत सहभाग घेताना आलेले अनुभव सांगावेत.
२० मि: “टेहळणी बुरूजचे नवे रूप!”b
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.