वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १/१ पृ. ३
  • वाचकहो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकहो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • टेहळणी बुरूजचे नवे रूप!
    आमची राज्य सेवा—२००७
  • ‘विरोध करणाऱ्‍या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत होऊ नका’
    आमची राज्य सेवा—२००८
  • टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • प्रिय वाचकांनो
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १/१ पृ. ३

वाचकहो

आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की या अंकापासून टेहळणी बुरूज नियतकालिकाचा चेहरामोहरा थोडा बदललेला दिसेल. हे बदल कोणकोणते असतील हे स्पष्ट करण्याअगोदर, कोणत्या गोष्टी पूर्वीसारख्याच राहतील हे पाहूया.

नियतकालिकाचे नाव, टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक हेच राहील. त्याअर्थी, टेहळणी बुरूज नियतकालिक पूर्वीसारखेच खरा देव यहोवा याचा सन्मान करत राहील आणि त्याच्या राज्याच्या सुवार्तेने आपल्या वाचकांचे सांत्वन करत राहील. या अंकाच्या पृष्ठे ५-९ वर, ते राज्य काय आहे आणि ते केव्हा येईल याविषयी चर्चा केली आहे. तसेच, टेहळणी बुरूज या नियतकालिकाने अनेक दशकांपासून केले आहे त्याप्रमाणेच ते यापुढेही येशू ख्रिस्तावर लोकांचा विश्‍वास वाढवण्यास, बायबलमधील सत्याचे समर्थन करण्यास व बायबलमधील भविष्यवाण्यांच्या आधारावर जागतिक घडामोडींचा उलगडा करण्यास प्रयत्नशील राहील.

मग वेगळे काय असेल? या त्रैमासिक अंकात कोणकोणती नवीन वैशिष्ट्ये असतील याविषयी आम्ही खुलासा करू इच्छितो.a

प्रत्येक अंकात अनेक विचारप्रवर्तक सदर प्रसिद्ध केले जातील. “तुम्हाला माहीत होते का?” या लेखात बायबलमधील निवडक उताऱ्‍यांवर प्रकाश टाकणारी पण तितकिशी प्रसिद्ध नसलेली रोचक माहिती सांगण्यात येईल. “देवाच्या जवळ या” या लेखात बायबलमधील विशिष्ट उताऱ्‍यांतून आपण यहोवाबद्दल काय शिकू शकतो यावर भर दिला जाईल. “वाचक विचारतात” या सदरात बायबलविषयी सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांच्या उत्तरांची चर्चा केली जाईल. उदाहरणार्थ, “देवाचे राज्य आपल्या हृदयात आहे का?” हा प्रश्‍न बरेचजण विचारतात. या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला सदर अंकातील पृष्ठ १३ वर सापडेल.

नियमित सदरांपैकी अनेक लेख खास कुटुंबांना फायदेकारक ठरावेत अशा दृष्टीने तयार केले जातील. “आनंदी कौटुंबिक जीवनाचे कानमंत्र” या सदरात कौटुंबिक समस्यांच्या वास्तविक उदाहरणांचे वर्णन करून बायबलमधील तत्त्वे या समस्या सोडवण्यात कशाप्रकारे उपयोगी ठरतात हे स्पष्ट केले जाईल. अधूनमधून “आपल्या मुलांना शिकवा” हा लेख प्रकाशित केला जाईल. हा लेख आईवडील आपल्या मुलांसोबत वाचू शकतील. आणखी एक वैशिष्ठ्यपूर्ण लेख, “आमच्या तरुण मित्रांकरता” या शीर्षकाखाली प्रकाशित केला जाईल आणि यात खास तरुणांकरता तयार केलेला बायबल अभ्यासाचा उपक्रम असेल.

या त्रैमासिक अंकात आणखी काही खास वैशिष्ट्ये असतील. “त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा” या सदरात बायबलमधून कोणत्याही एका व्यक्‍तीच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले जाईल. उदाहरणार्थ, याच अंकात १८-२१ पृष्ठांवर तुम्हाला संदेष्टा एलीया याच्याविषयी व आपण त्याच्या विश्‍वासाचे अनुकरण कसे करू शकतो याविषयी एक हृदयस्पर्शी लेख वाचायला मिळेल. “. . . पत्र” या सदरात जगाच्या निरनिराळ्या भागांतून मिशनऱ्‍यांनी व इतरांनी पाठवलेली वृत्ते सादर केली जातील. “येशूकडून शिकण्यासारखा धडा” या लेखात बायबलच्या मूलभूत शिकवणी अगदी साध्या-सोप्या भाषेत सादर केल्या जातील.

आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व वाचक, जे बायबलचा आदर करतात आणि त्यांतील खऱ्‍या शिकवणी जाणून घेऊ इच्छितात ते टेहळणी बुरूज नियतकालिकाला पुढेही आपली पसंती दर्शवतील. हे नियतकालिक बायबल सत्यांविषयी तुमची जिज्ञासा तृप्त करेल अशी आशा आम्ही बाळगतो.

प्रकाशक (w०८ १/१)

[तळटीप]

a यापुढे टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित होतील. त्रैमासिक आवृत्ती सर्वसामान्य जनतेकरता असेल आणि दर महिन्याच्या १५ तारखेचा अंक हा अभ्यास अंक असेल. यहोवाचे साक्षीदार आपल्या मंडळीच्या सभांमध्ये अभ्यास अंकाचा वापर करतील. अर्थात या सभांमध्ये सर्वच लोकांना प्रवेश असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा