सेवा सभा आराखडा
जुलै ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २ (१५)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, जुलै १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: खऱ्या आनंदाचे गुपीत काय? टेहळणी बुरूज, जून १, २००६ अंकातील पृष्ठे १६-१७, परिच्छेद ११-१२ यावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. सुखविलासांच्या मागे लागण्याऐवजी व जगिक व्यवसायात गुंतण्याऐवजी ख्रिस्ती सेवाकार्याला आपल्या जीवनात महत्त्व दिलेल्या एखाद्याची संक्षिप्त मुलाखत घ्या. आध्यात्मिक ध्येये मिळवण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? यामुळे कशाप्रकारे आनंद अनुभवण्यास मिळाला आहे? याविषयी त्यांना विचारावे.
२० मि: प्रश्न पेटी. हा भाग वडिलांनी हाताळावा. संपूर्ण लेख वाचून त्यावर चर्चा करावी.
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा.
२० मि: मंडळीतील शांती व शुद्धता कायम राखणे. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
१५ मि: “सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होईल.”a स्थानिक क्षेत्रात या माहितीचा कशाप्रकारे उपयोग करता येईल हे सांगावे.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ३ (३२)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, ऑगस्ट १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसे सादर करावेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
२० मि: एकमेकांचा पाहुणचार करा. टेहळणी बुरूज, जानेवारी, १५, २००५ अंकातील, पृष्ठे २१-३ यातील माहितीवर आधारित भाषण. पाहुणचार करण्याच्या बाबतीत चांगले नाव असलेल्या एक किंवा दोन प्रचारकांच्या संक्षिप्त मुलाखती घ्याव्यात. ते पाहुणचार करण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतात? यामुळे त्यांना व त्यांच्या कुटंबाला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत? शहरातील ज्या मंडळ्या इतर भाषेच्या मंडळ्यांसोबत एकाच क्षेत्रात कार्य करतात त्यांनी पाहुणचाराविषयीच्या भागाऐवजी, SB:SSB एप्रिल १६, २००७ तारखेच्या पत्राची चर्चा करावी. सेवा पर्यवेक्षकाने ही चर्चा हाताळावी. मंडळीला मिळणाऱ्या मासिकांच्या संख्येत काही फेरबदल करण्याची गरज आहे का, याविषयी चर्चा करून आवश्यक बदल करावेत. तसेच, पत्रात सांगितल्यानुसार पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी इतर भाषेचे बायबल अभ्यास त्या विशिष्ट भाषेच्या मंडळीला सुपूर्द करण्याविषयी प्रोत्साहन द्यावे.
१५ मि: आत्मत्यागामुळे यहोवाचा आशीर्वाद मिळतो. टेहळणी बुरूज, एप्रिल १, २००५ अंकातील पृष्ठे ९-१० परिच्छेद ५-११ यातील माहितीवर आधारित भाषण.
गीत क्र. २५ (२०४) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जुलै महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि: आपल्या कार्याविषयी लोकांना गैरसमज होतो तेव्हा. हा भाग एका सुयोग्य वडिलाने हाताळावा. SA:LLC एप्रिल २८, २००३ तारखेच्या पत्रासोबत पुरवलेल्या रूपरेषेची उजळणी करावी. या माहितीचा स्थानिक परिस्थितीत कसा वापर करता येईल हे स्पष्ट करावे. प्रचारकांच्या कोणत्या नेहमीच्या विधानांमुळे, इतर धर्मांच्या लोकांना राग येण्याची शक्यता आहे? याबाबतीत सावधगिरी बाळगण्याच्या गरजेवर जोर द्यावा. तसेच, क्षेत्रात मोठ्या गटांनी एकत्र न येण्याविषयीही उल्लेख करावा.
२० मि: “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य.”b परिच्छेद ३ वर चर्चा करताना, श्रोत्यांना विचारा की त्यांच्या जीवनात अचानक परीक्षाप्रसंग आला तेव्हा दृढ विश्वासामुळे त्यांना कशाप्रकारे साहाय्य मिळाले? एक किंवा दोन अभिप्राय आधीपासूनच तयार करून घ्यावेत.
गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: “आपण वारंवार लोकांकडे का जातो?”c परिच्छेद ५ वर चर्चा करताना, श्रोत्यांना विचारा की जर ते पूर्वी सत्याचा विरोध करत होते किंवा त्यांना त्याविषयी आवड नव्हती तर कोणत्या गोष्टीने त्यांना आस्था दाखवण्यास प्रेरित केले?
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.