वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०७ पृ. १
  • सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होईल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही केवळ बाह्‍यस्वरुप बघता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही केवळ बाह्‍यस्वरूप पाहता का?
    आमची राज्य सेवा—१९९९
  • वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ७/०७ पृ. १

सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होईल

१. देवासोबत आपला चांगला संबंध कशावर अवलंबून आहे?

१ देवाच्या अपार कृपेमुळे तारणाचा मार्ग खुला झाला आहे. यहोवाची अशी इच्छा आहे की “सर्व [“प्रकारच्या,” NW] माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:३, ४) देवासोबत चांगला संबंध असणे हे आपल्या भाषेवर, आर्थिक स्थितीवर, अंगभूत गुणांवर, किंवा बाह्‍य स्वरूपावर नव्हे तर येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास प्रदर्शित करण्यावर अवलंबून आहे. (योहा. ३:१६, ३६) देवाचे सहकर्मी या नात्याने आपण आपल्या मनातून असे सर्व पूर्वग्रह काढून टाकले पाहिजेत, नाहीतर आपण यहोवा ज्यांना स्वीकारण्यास तयार आहे त्यांना झिडकारणारे बनू.

२, ३. लोकांचे बाह्‍य स्वरूप पाहून त्यांचा न्याय न करण्यास आपल्याला कोणती गोष्ट साहाय्य करेल?

२ न्याय करू नका: यहोवा कोणताही दुजाभाव किंवा पक्षपात न बाळगता, लोकांच्या अंतःकरणाकडे पाहतो. (१ शमु. १६:७) तसेच ते सध्या कसे आहेत ते नव्हे, तर ते कसे बनू शकतात हे ही तो पाहतो. म्हणूनच, जे त्याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छितात त्यांना तो निवडक वस्तूंप्रमाणे लेखतो. (हाग्ग. २:७) आपणही इतरांकडे देवाच्या दृष्टिकोनाने पाहतो का?

३ क्षेत्रसेवेत भेटणाऱ्‍या काही लोकांचा पेहराव पाहून आपल्याला धक्का बसू शकतो. कदाचित त्यांचा पेहराव अत्यंत गबाळा, असभ्य असेल, त्यांची दाढी वाढलेली असेल किंवा ते अत्यंत गरिबीत राहात असतील. काहीजणांना तर कदाचित घरही नसेल. किंवा काहीजण आपल्याशी अत्यंत कठोरपणे वागतील. अशा प्रकारच्या व्यक्‍तींचा न्याय करून ते कधीच यहोवाचे उपासक बनू शकत नाहीत असे मत बनवण्याऐवजी, आपण आशावादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. कारण “आपणहि पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, [व] बहकलेले” होतो. (तीत ३:३) याची जाणीव ठेवून आपण सर्वांना, जे बाहेरून पाहिल्यास लायक नाहीत असे वाटते, त्यांनाही सुवार्ता सांगण्यास उत्सुक असले पाहिजे.

४, ५. येशू व पौलाच्या उदाहरणांवरून आपण काय शिकतो?

४ आपल्या निःपक्ष देवाचे अनुकरण करणे: ‘हे कधीच बदलू शकत नाहीत’ असे समजून ज्यांच्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले त्यांना मदत करण्यास येशू ख्रिस्ताने पुढाकार घेतला. (लूक ८:२६-३९) अयोग्य वर्तनाकडे येशूने डोळेझाक केली नाही पण त्याला माहीत होते की कधीकधी लोक नकळत चुकीच्या मार्गाला लागतात. (लूक ७:३७, ३८, ४४-४८) आणि म्हणूनच त्याने अशा लोकांप्रती समजूतदारपणा दाखवला. हे लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला.” (मार्क ६:३४) आपण येशूच्या उदाहरणाचे आणखी चांगल्याप्रकारे अनुकरण करू शकतो का?

५ प्रेषित पौलाला दगडमार करण्यात आला, मारहाण करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आले. (प्रे. कृत्ये १४:१९; १६:२२, २३) अशा कष्टदायी अनुभवांमुळे त्याचे मन कलुषित झाले का? विशिष्ट राष्ट्राच्या व जातीच्या लोकांना सुवार्ता सांगण्यात आपण आपला वेळ वाया घालवत आहोत असा निष्कर्ष त्याने काढला का? मुळीच नाही. त्याला माहीत होते की ‘सर्व प्रकारच्या माणसांमध्ये’ प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्‍ती आहेत आणि अशा व्यक्‍तींना शोधून काढण्याचा त्याचा निर्धार होता. आपल्या क्षेत्रात जे वेगळ्या पार्श्‍वभूमीचे व संस्कृतीचे लोक आहेत त्यांच्याविषयी आपणही हाच दृष्टिकोन बाळगतो का?

६. आपल्या निःपक्ष देवाचे आपण अनुकरण कसे करू शकतो?

६ आपल्या निःपक्ष देवाचे अनुकरण करून आपणही यहोवा देवाच्या अपार कृपेचा लाभ करून घेण्यास सर्वांना निमंत्रित करू या.—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा