वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. १
  • धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • धीर—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य”
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. १

धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल

१ “तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.” (लूक २१:१९) ‘युगाच्या समाप्तीविषयी’ येशूने केलेल्या भविष्यवाणीत वरील शब्दांचा समावेश आहे; आणि या शब्दांवरून अगदी स्पष्ट होते की आपली सचोटी कायम राखण्याकरता आपण अनेक परीक्षांना तोंड देण्यास तयार असले पाहिजे. यहोवाच्या सामर्थ्याने आपल्यापैकी प्रत्येकजण ‘शेवटपर्यंत धीर धरू’ शकतो, जेणेकरून आपले ‘तारण’ होईल.—मत्त. २४:३, १३; फिलिप्पै. ४:१३.

२ छळ, आजारपण, आर्थिक समस्या आणि भावनिक दुःख यामुळे प्रत्येक दिवस एका कठीण परीक्षेसमान भासू शकतो. पण आपण कधीही हे विसरू नये की आपण यहोवाला सोडून द्यावे म्हणून सैतान आपल्याला प्रवृत्त करू इच्छितो. आपण आपल्या पित्याला निष्ठावान राहतो तो प्रत्येक दिवस त्याची निंदा करणाऱ्‍याला उत्तर देण्यास आपण मदत केलेला आणखी एक दिवस ठरतो. परीक्षांना तोंड देताना आपण गाळलेली “आसवे” व्यर्थ नाहीत हे जाणणे खरोखर किती समाधानदायक आहे! यहोवा आपल्या अश्रूंना मोलवान समजतो आणि आपण विश्‍वासू राहतो तेव्हा त्याचे मन आनंदित होते!—स्तो. ६५:८; नीति. २७:११.

३ परीक्षांमुळे व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा: आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांमुळे आपल्या व्यक्‍तिमत्त्वात असलेले, गर्व अथवा उतावीळपणा यांसारखे अवगुण किंवा आपल्या विश्‍वासातील कमजोरी दिसून येण्याची शक्यता आहे. तेव्हा, गैरशास्त्रीय पद्धतीने परीक्षांना चुकवण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या” या देवाच्या वचनातील सल्ल्याचे आपण पालन केले पाहिजे. का? कारण परीक्षांमध्ये विश्‍वासूपणे धीर धरल्याने आपण ‘कशांतहि उणे न होता, आपल्याला अखंड परिपूर्णता प्राप्त होते.’ (याको. १:२-४) तसेच धीर धरल्याने सौम्यता, सहानुभूती आणि दया यांसारखे अनमोल गुण विकसित करण्यासही आपल्याला साहाय्य मिळते.—रोम. १२:१५.

४ विश्‍वासाच्या परीक्षेत उतरणे: परीक्षांना तोंड देताना आपण धीर धरतो तेव्हा आपला विश्‍वास जणू तावून सुलाखून निघतो आणि हा कसोटीस उतरलेला विश्‍वास देवाच्या नजरेत अतिशय मोलाचा आहे. (१ पेत्र १:६, ७) असा विश्‍वास आपल्याला भविष्यात येणाऱ्‍या परीक्षांनाही यशस्वीरित्या तोंड देण्यास मदत करतो. शिवाय आपल्याला देवाची संमती आहे ही जाणीव आपल्या आशेला दृढ करते जेणेकरून ती आपल्याला अगदी वास्तविक वाटू लागते.—रोम. ५:३-५.

५ धीर धरण्याचे सर्वात उत्तम प्रतिफळ याकोब १:१२ येथे स्पष्ट करण्यात आले आहे: “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण . . . प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.” तर, यहोवाच्या भक्‍तीत आपण सदोदित स्थिर राहू या आणि हा विश्‍वास बाळगू या, की यहोवा “आपणावर प्रीति करणाऱ्‍यांना” विपूल प्रतिफळ देईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा