वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०७ पृ. १०
  • “उत्तरे द्या पाहू”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “उत्तरे द्या पाहू”
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • प्रिय वाचकांनो
    सावध राहा!—२००६
  • (१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय
    आमची राज्य सेवा—२००६
  • संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • वाचकहो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ३/०७ पृ. १०

“उत्तरे द्या पाहू”

१. आपल्यापैकी बहुतेकजणांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?

१ देवाचे वचन तुम्हाला प्रिय वाटते तरीसुद्धा, कधीकधी बायबल वृत्तान्तांतील बारीकसारीक गोष्टी किंवा विशिष्ट विधान बायबलमध्ये नेमके कोठे आहे हे आठवणीत ठेवायला तुम्हाला कठीण जाते का? बायबलमधील मूलभूत माहिती आणि शिकवणुकी तुमच्या मुलांच्या मनात पक्क्या बसाव्यात असे तुम्हाला वाटते का? सावध राहा! यात नियमित प्रकाशित होणारे “उत्तरे द्या पाहू” हे सदर लहान मुलांना आणि त्यासोबतच मोठ्यांनाही देवाच्या वचनाशी सुपरिचित होण्यास साहाय्य करू शकते.—प्रे. कृत्ये १७:११.

२. “उत्तरे द्या पाहू” यातील निरनिराळे भाग कशाप्रकारे उपयोगात आणले जाऊ शकतात?

२ या सदराचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा उठवू शकता? सावध राहाच्या! एप्रिल-जून २००६ अंकात पुढील काही गोष्टी सुचवल्या होत्या: “पृष्ठ ३१ वरील काही गोष्टी लहान मुलांना विशेष आवडतील; इतर काही विभागांचा उपयोग, बायबलचा सखोल अभ्यास करणारे वाचक आपल्या स्मरणशक्‍तीची परीक्षा पाहण्यासाठी करू शकतात. ‘हे इतिहासात केव्हा घडले?’ हा विभाग तुम्हाला एका रेषेवर, बायबलमधील निरनिराळ्या व्यक्‍ती कोणत्या काळात जगत होत्या व निरनिराळ्या महत्त्वाच्या घटना केव्हा घडल्या हे सूचित करण्यास मदत करेल. ‘या अंकातून’ या सदरात विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे त्या अंकातील लेखांत सापडतील, पण इतर बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरे त्याच अंकातील विशिष्ट पृष्ठावर उलटी छापलेली आढळतील. ही उत्तरे वाचण्याआधी थोडेसे संशोधन करून, तुम्हाला काय शिकायला मिळाले हे तुम्ही इतरांनाही सांगू शकता. ‘उत्तरे द्या पाहू’ या नव्या सदराचा उपयोग तुम्ही कौटुंबिक चर्चेकरता किंवा इतर समूह चर्चेकरता करू शकता.”

३. काही कुटुंबांना हे सदर कशाप्रकारे उपयोगी ठरले आहे, आणि तुम्हाला यातला कोणता भाग विशेष आवडतो?

३ बऱ्‍याच कुटुंबांना खरोखरच हे सदर कौटुंबिक अभ्यासाकरता अतिशय उपयुक्‍त असल्याचे आढळले आहे. ब्राझील येथे राहणाऱ्‍या एका वडिलांनी असे सांगितले: “मॉइझेझ या माझ्या सात वर्षांच्या मुलाला व मला सावध राहाचे! हे सदर खूपच आवडते. या सदराने त्याला लक्ष देण्यास, वचने उघडून पाहण्यास, चित्रांचा अर्थ समजण्यास आणि तारखांचे महत्त्व समजून घेण्यास खूपच साहाय्य झाले आहे.” आठ वर्षांच्या ॲश्‍लीने असे लिहिले: “‘उत्तरे द्या पाहू’ या सावध राहाच्या! शेवटल्या पृष्ठावर येणाऱ्‍या सदराबद्दल आभार. यामुळे मला बायबलचे बरेच ज्ञान मिळाले आहे.”

४. कौटुंबिक बायबल अभ्यासात या सदराचा कशाप्रकारे समावेश केला जाऊ शकतो?

४ तुम्ही देखील “उत्तरे द्या पाहू” या सदराचा तुमच्या कौटुंबिक अभ्यासात समावेश करून पाहू शकता. काही प्रश्‍न कठीण वाटल्यास त्यांची उत्तरे शोधण्याकरता तुम्ही इंडेक्स किंवा वॉचटावर लायब्ररी सीडी-रॉमचा उपयोग करू शकता. असे केल्याने तुम्ही आपल्या मुलांना संशोधन करण्याचे प्रशिक्षण देऊ शकाल. जर तुमची मुले मोठी असतील तर “मी कोण आहे?” किंवा “हे इतिहासात केव्हा घडले?” या प्रश्‍नांवर कौटुंबिक अभ्यासाच्या आधी संशोधन करून ठेवण्यास तुम्ही त्यांना नेमू शकता. मग अभ्यासादरम्यान ते संशोधनातून मिळवलेली माहिती सर्वांना सांगू शकतात. या पृष्ठाचा चांगल्याप्रकारे उपयोग केल्यास, मुलांच्या मनावर देवाचे वचन बिंबवण्याचा अर्थात बालपणापासूनच त्यांना “पवित्र शास्त्राची” माहिती देण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो.—२ तीम. ३:१५; अनु. ६:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा