मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज मार्च १
“आज बरेच जण आपल्या कौटुंबिक जीवनात समाधानी नाहीत. विवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जीवनात यशस्वी होण्याकरता काय करू शकतात? [उत्तर ऐकून घ्या. इफिसकर ५:३३ वाचा आणि मग पृष्ठ ९ पासून सुरू होणारे लेख उघडून दाखवा.] या लेखमालेत पती व पत्नी यांच्या भूमिकांविषयी सांगितले आहे तसेच सुखी कौटुंबिक जीवनाकरता काही व्यवहारोपयोगी सूचना दिल्या आहेत.”
सावध राहा! जाने.-मार्च
“काहीजणांचे असे मत आहे की जे काही घडते त्याकरता देव जबाबदार आहे. एखादी दुर्घटना घडते तेव्हा ते म्हणतात की हे घडवून आणण्यामागे नक्कीच देवाचा काहीतरी चांगला हेतू असावा. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग याकोब १:१३ वाचा.] दुःखद घटना का घडतात आणि त्यांचा अंत करण्याकरता देव आज काय करत आहे या प्रश्नांची बायबलमधील उत्तरे या मासिकात दिली आहेत.”
टेहळणी बुरूज एप्रि. १
“दररोजच आपल्यासमोर आरोग्य, कुटुंब, नोकरीव्यवसाय यांसारख्या विषयांवर लहानमोठे प्रश्न येतात. तुमच्या मते या प्रश्नांची विश्वासार्ह व व्यवहारोपयोगी उत्तरे आपल्याला कोठे सापडतील? [उत्तर ऐकून घ्या.] २ तीमथ्य ३:१६ यात बायबल काय सांगते ते पाहा. [वचन वाचा.] बायबल आपल्याला अनेक व्यवहार्य मार्गांनी कशाप्रकारे मदत करू शकते याविषयी या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“या वचनात जे म्हटले आहे ते खरच कधी घडेल असे तुम्हाला वाटते का? [यशया ३३:२४ वाचा आणि उत्तर ऐकून घ्या.] वैद्यकीय शास्त्राने आज कोणकोणते शोध लावले आहेत आणि बायबलची ही प्रतिज्ञा कशाप्रकारे पूर्ण होईल याविषयी या मासिकात खुलासा केला आहे.”