स्मारकविधीकरता सूचना
या वर्षी स्मारक विधीची तारीख सोमवार, एप्रिल २ ला येते. त्या अनुषंगाने वडिलांनी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे:
▪ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करावी.
▪ वक्त्यासहित सर्वांना समारंभाच्या निश्चित वेळेची व ठिकाणाची आगाऊ माहिती दिली जावी.
▪ उचित प्रकारची भाकरी आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २००३, पृष्ठे १४-१५ पाहा.
▪ प्लेट्स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू आधीच सभागृहात आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.
▪ राज्य सभागृहाची किंवा ज्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे त्या ठिकाणाची नीट साफसफाई आधीच करण्यात यावी.
▪ सेवकांची तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्या बांधवांची आधीच निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल, योग्य पद्धतीबद्दल तसेच उचित वेशभूषा व केशभूषा यांविषयी सूचना देण्यात याव्यात.
▪ आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे कोणी अभिषिक्त जन समारंभाला हजर राहू शकत नसल्यास, त्यांना बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.
▪ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहन तळे यांठिकाणी अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून सर्व मंडळ्यांनी एकमेकांना सहयोग द्यावा.