वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०६ पृ. १२
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km १२/०६ पृ. १२

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज डिसें. १

“द्वेष आणि संघर्ष चाललेल्या या जगात आपण शांतीप्रिय कसे राहू शकतो? [घरमालकाचे मत ऐकण्यासाठी थांबा आणि मग मत्तय २२:३९ वाचा. मग पृष्ठ २६ वरील लेख दाखवा.] आपले शेजारी कोण आहेत आणि त्यांना प्रेम दाखवण्याचा अर्थ काय, हे या लेखात सांगितले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“आपल्याला निर्माण करण्यात आले आहे, असा पुष्कळ लोकांचा विश्‍वास आहे. काहींना वाटते, की आपली उत्क्रांती झाली. तुमचे याबाबतीत काय मत आहे? [मत ऐका.] आपण उचित निष्कर्ष काढावा म्हणून आपल्याला साहाय्य करणारी ही सूचना पाहा. [ईयोब १२:७, ८ वाचा.] सावध राहाच्या! या विशेषांकात, निसर्गात मिळणाऱ्‍या बुद्धीच्या व रचनेच्या पुराव्यावरून आपण काय शिकू शकतो त्याची चर्चा करण्यात आली आहे.”

टेहळणी बुरूज जाने. १

“एखाद्या व्यक्‍तीच्या संपत्तीवरून आपण तिचे यश मोजू शकतो, असे तुम्हाला वाटते का? [मत ऐकून घ्या. मग १ तीमथ्य ६:९, १० वाचा.] बायबल पैशाचा निषेध करत नाही परंतु ते हे सांगते, की खरे यश धनसंपत्तीवर अवलंबून नाही. याविषयी अधिक माहिती या मासिकात आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च

“एक प्रेमळ, न्यायी, शक्‍तिशाली देव आहे तर आज जगात इतके दुःख का, हा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का? [घरमालकाचे उत्तर ऐकून घ्या.] दुःखाचे कारण काय याविषयी या शास्त्रवचनात काय म्हटले आहे ते पाहा. [१ योहान ५:१९ वाचा.] दुःखाचा अंत करण्यासाठी देव काय करणार आहे याविषयीची बायबलमधील माहिती या मासिकात आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा