वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०६ पृ. १२
  • तुमच्याकडे वैयक्‍तिक क्षेत्र आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्याकडे वैयक्‍तिक क्षेत्र आहे का?
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • वैयक्‍तिक क्षेत्राचा फायदा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०००
  • लोक घरी भेटत नाहीत तेव्हा
    आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००६
km १२/०६ पृ. १२

तुमच्याकडे वैयक्‍तिक क्षेत्र आहे का?

१. वैयक्‍तिक क्षेत्र म्हणजे काय?

१ वैयक्‍तिक क्षेत्र म्हणजे खास तुम्हाला नेमण्यात आलेले क्षेत्र. हे क्षेत्र तुमच्या सोयीच्या ठिकाणी असू शकते, जेणेकरून तेथे जाण्यास तुम्हाला जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही. आणि या क्षेत्रात तुम्ही एकतर एकटेच नाहीतर दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकासोबत कार्य करू शकता. अर्थात, मंडळीच्या सामुहिक साक्षकार्याला जमेल तेव्हा सहकार्य देणे आपल्या हिताचे आहे. पण इतर वेळी साक्षकार्य करण्याकरता वैयक्‍तिक क्षेत्र असल्यामुळे क्षेत्र चांगल्याप्रकारे पूर्ण करणे शक्य होते. विशेषतः ज्या मंडळ्यांना मोठे क्षेत्र नेमलेले असेल त्या मंडळ्यांत ही व्यवस्था उपयुक्‍त ठरू शकते.—प्रे. कृत्ये १०:४२.

२. वैयक्‍तिक क्षेत्र असण्याचे कोणते फायदे आहेत?

२ फायदे: काहींना आपल्या नोकरीच्या ठिकाणाजवळ वैयक्‍तिक क्षेत्र घेणे सोयीचे वाटते कारण जेवणाच्या सुटीत किंवा कामानंतर लगेच ते क्षेत्रात जाऊन साक्षकार्य करू शकतात. इतर काही जणांना आपल्या राहत्या परिसराजवळ असलेले वैयक्‍तिक क्षेत्र सोयीचे वाटते कारण मंडळीच्या पुस्तक अभ्यासाच्या एखाद्या तासाआधी ते या क्षेत्रात जाऊन आपल्या कुटुंबासोबत साक्षकार्य करू शकतात. असे केल्यामुळे त्यांच्या पुनर्भेटी व बायबल अभ्यास जवळच्या क्षेत्रात असतील आणि यामुळे वेळ, शक्‍ती व खर्चाच्या दृष्टीने बरीच बचत होऊ शकेल. वैयक्‍तिक क्षेत्र असल्यास, कमी वेळात जास्त कार्य साध्य करणे शक्य असल्यामुळे काहीजणांना वेळोवेळी सहायक पायनियर सेवा किंवा सामान्य पायनियर सेवा देखील हाती घेण्याचे प्रोत्साहन मिळू शकेल. शिवाय, वैयक्‍तिक क्षेत्रात कार्य केल्यामुळे प्रचारकाला घरमालकांशी चांगली ओळख करून घेता येईल, आणि यामुळे त्यांचा विश्‍वास संपादन करणे आणि त्यांच्या परिस्थितीनुसार आपली सादरता जुळवून घेणे शक्य होईल. अशारितीने आपले सेवाकार्य अधिक परिणामकारक होईल.

३. वैयक्‍तिक क्षेत्र मिळवलेल्या एका पायनियर बहिणीचा अनुभव सांगा.

३ एका पायनियर बहिणीला विभागीय पर्यवेक्षकांनी वैयक्‍तिक क्षेत्र मिळवण्याचे प्रोत्साहन दिले. ती सांगते: “त्यांनी सांगितल्यानुसार मी केले आणि लवकरच माझ्या क्षेत्रात राहणाऱ्‍या लोकांशी माझी अगदी चांगली ओळख झाली. मी त्यांच्या सोयीच्या वेळी त्यांच्या भेटी घेऊ लागले. यामुळे, पूर्वी महिन्याला ३५ पुनर्भेटी करणारी मी ८० पेक्षा जास्त पुनर्भेटी करू लागले आणि आता माझ्याकडे सात बायबल अभ्यास आहेत.”

४. तुम्ही वैयक्‍तिक क्षेत्र मिळवून त्यात कशाप्रकारे कार्य करू शकता?

४ कसे मिळवाल?: जर तुम्हाला वैयक्‍तिक क्षेत्र हवे असेल, तर तुमच्या मंडळीत क्षेत्र वाटपाचे काम बघणाऱ्‍या बांधवाशी याविषयी बोला. वैयक्‍तिक क्षेत्र मिळाल्यावर तुम्ही दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकालाही आपल्यासोबत कार्य करण्यास बोलावू शकता. घरी न भेटलेल्या लोकांची नोंद ठेवा. तुम्हाला नेमलेले क्षेत्र चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला क्षेत्र पूर्ण करणे कठीण वाटत असेल, तर मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना अथवा इतरांना तुम्ही साहाय्याकरता विनंती करू शकता. चार महिने संपल्यावर एकतर तुम्ही पूर्ण झालेल्या क्षेत्राचे कार्ड परत करू शकता किंवा पुन्हा याच क्षेत्रात कार्य करण्याची विनंती करू शकता. पण एखादे क्षेत्र अनिश्‍चित काळासाठी आपल्याजवळ ठेवू नका, कारण इतरजणांनाही कदाचित त्या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असेल. जर तुमच्या मंडळीला नेमलेले क्षेत्र मर्यादित असेल आणि वैयक्‍तिक क्षेत्र मिळणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना क्षेत्राचा विशिष्ट भाग तुम्हाला नेमण्याची विनंती करू शकता.

५. प्रचार करण्याची आपली जबाबदारी पूर्ण करण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे?

५ “सर्व जगात” सुवार्तेची घोषणा करण्याचे जे कार्य आपल्यावर सोपवण्यात आले आहे ते काही साधेसुधे काम नाही. (मत्त. २४:१४) हे कार्य साध्य करण्याकरता उत्तम सहकार्याची गरज आहे. पुस्तक अभ्यास गटासोबत प्रचार करण्याव्यतिरिक्‍त वैयक्‍तिक क्षेत्रात प्रचार कार्य केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवणे आपल्याला शक्य होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा