वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ९/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जुलै-सप्टें.

“आपल्या दिवसांत, भूकंपांमुळे बरेच नुकसान झाले आहे आणि लाखो लोकांचा बळी गेला आहे. जे यांतून वाचतात ते बहुतेक बेघर होतात, पुन्हा काही मिळण्याची त्यांना आशाच नसते. सावध राहा! च्या या अंकात, भूकंपाला बळी पडलेले लोक कसे सावरू शकले हे दाखवले आहे. भूकंप हे बायबलमधील एका महत्त्वाच्या भविष्यवाणीला कसे चित्रित करतात, हे देखील यांत सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज सप्टें. १५

“कोट्यवधी लोकांना असे वाटते, की ‘संतांजवळ’ खास शक्‍ती असते व त्यांच्याद्वारे प्रार्थना करणे चांगले असते. याबाबतीत तुमचे काय मत आहे? [उत्तरासाठी थांबा.] येशू ख्रिस्ताने याबाबतीत काय म्हटले ते पाहा. [योहान १४:६ वाचा.] यामुळे, काही लोक ‘संतांद्वारे’ प्रार्थना करणे उचित आहे की नाही यावर विचार करू लागतात. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आहे, हो ना? तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी कदाचित उच्च रक्‍त दाबाचा त्रास असेल. [उत्तरासाठी थांबा आणि पृष्ठ १५ वरील लेख दाखवा.] आपल्या निर्माणकर्त्याने काय अभिवचन दिले आहे ते पाहा. [यशया ३३:२४ वाचा.] हा लेख तुम्हाला खूप माहितीपूर्ण व व्यावहारिक वाटेल अशी माझी खात्री आहे.”

टेहळणी बुरूज ऑक्टो. १

“युद्धे, गुन्हेगारी, भीतीदायक कृत्ये यांसारख्या आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या समस्यांचा कधी अंत होईल का, असा प्रश्‍न अनेक लोकांच्या मनात येतो. तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमध्ये सांत्वनदायक हमी दिली आहे. [स्तोत्र ३७:१०, ११ वाचा.] देवाने अजूनपर्यंत दुष्टाईचा व त्यामुळे होणाऱ्‍या दुःखाचा अंत का केला नाही याचे कारण या नियतकालिकात दिले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा