वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०६ पृ. १
  • तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय?
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवापासून दूर न नेवो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • वेळेचा सदुपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km १०/०६ पृ. १

तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय?

१ तुम्ही या प्रश्‍नाचे कसे उत्तर द्याल? अर्थात, आपल्या सर्वांनाच देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना जीवनात सर्वाधिक महत्त्व देण्याची इच्छा असते. (मत्त. ६:३३) पण आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, की ‘मी जीवनात जे निर्णय घेतो त्यावरून हे दिसून येते का?’ बायबल आपल्याला सदोदीत स्वतःची ‘प्रतीति पाहण्याचे’ प्रोत्साहन देते. (२ करिंथ. १३:५) तर मग, आपण राज्याच्या कार्यांना सर्वाधिक महत्त्व देत आहोत किंवा नाही याविषयी आपण स्वतःची प्रतीती कशी पाहू शकतो?

२ आपला वेळ: सर्वप्रथम आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचा आपण कसा उपयोग करतो याचे आपण परीक्षण करू शकतो. (इफिस. ५:१५, १६) दर आठवड्यात तुम्ही मित्रांशी, नातेवाईकांशी भेटीगाठी करण्यात, टीव्ही पाहण्यात, इंटरनेटचा वापर करण्यात किंवा एखाद्या छंदासाठी किती वेळ खर्च करता? यांसारख्या गोष्टींना आपण किती वेळ देतो हे जर आपण एका कागदावर लिहून काढले आणि मग आध्यात्मिक कार्यांकरता आपण जो वेळ खर्च करतो त्याच्याशी त्याची तुलना केली तर कदाचित, आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसेल. महागड्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी, आपण आपल्या पवित्र उपासनेकडे दुर्लक्ष करून ओव्हरटाईम करतो का? मनोरंजनाकरता आठवड्याच्या सुटीदरम्यान सहलींचे आयोजन करून आपण कितीदा सभा व सेवाकार्य बुडवतो?

३ कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या हे ठरवा: आपल्याला बरेच काही करण्याची इच्छा असते. पण त्या सर्वच गोष्टींकरता आपल्याजवळ पुरेसा वेळ नसतो. तेव्हा, जर आपल्याला राज्याच्या कार्यांना सर्वाधिक महत्त्व द्यायचे असेल, तर कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या हे ठरवून या “श्रेष्ठ” गोष्टींकरता निश्‍चित वेळ बाजूला काढणे गरजेचे आहे. (फिलिप्पै. १:१०) देवाच्या वचनाचा अभ्यास करणे, सेवाकार्यात सहभाग घेणे, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे या त्यांपैकी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. (स्तो. १:१, २; रोम. १०:१३, १४; १ तीम. ५:८; इब्री १०:२४, २५) इतर कार्ये, उदाहरणार्थ माफक प्रमाणात व्यायाम व निकोप मनोरंजन याही गोष्टी फायदेकारक आहेत. (मार्क ६:३१; १ तीम. ४:८) पण कमी महत्त्वाच्या गोष्टींमुळे अधिक महत्त्वाच्या राज्याच्या कार्यांत व्यत्यय येता कामा नये.

४ एका तरुण बांधवाने जगिक करियरची तयारी करण्याकरता उच्च शिक्षणाच्या मागे न लागता पूर्ण वेळेची सेवा सुरू करून राज्याच्या कार्यांना प्राधान्य देण्याचे ठरवले. तो दुसरी भाषा शिकून जेथे राज्य प्रचारकांची गरज अधिक आहे अशा ठिकाणी राहायला गेला. तो म्हणतो: “हा माझ्या जीवनातला सर्वात आनंददायक काळ आहे. सेवाकार्य करताना किती समाधान मिळते! मला तर वाटतं की प्रत्येक तरुण व्यक्‍तीने माझ्यासारखा निर्णय घेऊन आज मी जो आनंद अनुभवत आहे तो अनुभवून पाहावा. आपले सर्वस्व यहोवाच्या सेवेत अर्पण करण्यासारखा आनंद दुसऱ्‍या कशातच नाही.” होय, राज्याच्या कार्यांना प्राधान्य दिल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद लाभतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे यहोवाचे, आपल्या स्वर्गीय पित्याचे मन आनंदित होते.—इब्री ६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा