उत्साही प्रतिसाद!
१ जगातील सर्व ख्रिस्ती कुटुंबांनी तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी), या व्हिडिओची अगदी उत्साहाने प्रशंसा केली. अमेरिकेतील एका पित्याने म्हटले, की त्यांची मुले गुपचूप बसून व्हिडिओत पाहिलेल्या गोष्टींवर मनन करू लागली, व्हिडिओतील एकूणएक गोष्ट त्यांना समजली! मलावीतून आलेल्या एका अहवालात म्हटले होते, की तेथील तरुण बंधूभगिनी देखील व्हिडिओतील प्रत्येक गोष्ट समजू शकले कारण त्यांना त्यांच्या शाळेत अशाच प्रकारच्या दबावांचा सामना करावा लागतो. जर्मनीतील एका पित्याने व्हिडिओबद्दल म्हटले, की: “मला वाटतं, हे माझ्या प्रार्थनांचं उत्तर आहे.” एका तरुणीने म्हटले: “यहोवा माझी काळजी घेतो याची मला आठवण करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानते.” न्यूझीलंडमधील एका वडिलांनी लिहिले: “माझ्या एका किशोरवयीन मुलीला पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्यास या व्हिडिओने मदत केली.” एका विवाहित स्त्रीनेही हा व्हिडिओ पाहिला व म्हटले: “मला वाटतं, की सत्यात असलेल्या प्रत्येक तरुणानं/तरुणीनं हा व्हिडिओ जरूर पाहावा, यामुळे तो/ती सत्य आपलेसे करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकेल!” तेव्हा, कुटुंबांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहाल का? त्यानंतर, खाली दिलेल्या प्रश्नांची तुम्ही एकत्र मिळून चर्चा करू शकता.
२ प्रस्तावना: खरा मित्र कोण आहे?—नीति. १८:२४.
३ मैत्री करण्यामधील अडखळणे: तुमच्याकडे कोणाचे लक्ष नाही, तुम्ही एकटे आहात, याप्रकारच्या भावनेवर तुम्ही मात कशी करू शकता? (फिलिप्पै. २:४) तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करायला तुम्ही तयार का असले पाहिजे आणि असे करायला तुम्हाला कोण मदत करू शकेल? तुम्ही पुष्कळ मित्र कसे बनवू शकता आणि असे मित्र तुम्हाला कोठे मिळू शकतील?—२ करिंथ. ६:१३.
४ देवाबरोबर मैत्री: यहोवाबरोबर तुम्ही मैत्री कशी करू शकाल व या मैत्रीमुळे तुम्ही केव्हाही निराश का होणार नाही? (स्तो. ३४:८) देवाबरोबरची तुमची मैत्री मजबूत करायला कोण तुम्हाला मदत करू शकेल?
५ चुकीचे मित्र: वाईट मित्र कोणते असतात? (१ करिंथ. १५:३३) चुकीच्या मित्रांमुळे कशाप्रकारे आपली आध्यात्मिकता नष्ट होऊ शकते? बायबलमधील दीनाची गोष्ट तुम्हाला काय शिकवते?—उत्प. ३४:१, २, ७, १९.
६ आधुनिक दिवसातील नाटक: एकाकीपणाचा तारावर कसा परिणाम झाला होता? जगीक युवकांबरोबर आपली संगत चुकीची नाही ही सबब ती कशी देत होती? पण यामुळे तिच्यासमोर कोणते धोके निर्माण झाले होते? ती कोणत्या धोक्यात अडकली होती हे तिच्या पालकांना का समजले नाही, पण कोणती मनोवृत्ती बाळगून तिच्या पालकांनी तिला आध्यात्मिकरीत्या पुन्हा मजबूत करण्यासाठी मदत केली? एक पायनियर भगिनी ताराची खरी मैत्रीण कशी ठरली? सर्व ख्रिश्चनांनी नीतिसूत्रे १३:२० आणि यिर्मया १७:९ या वचनांकडे लक्ष का दिले पाहिजे? तारा कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकली?
७ समाप्ती: या व्हिडिओतून तुम्ही कोणते धडे शिकलात? इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही त्यांचा कशाप्रकारे उपयोग करू शकाल?—स्तो. ७१:१७.