वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

सप्टेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. सप्टेंबर २५ च्या आठवड्यातील सेवा सभेत होणार असलेल्या चर्चेची तयारी करण्याकरता, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्यास सर्वांना उत्तजेन द्यावे. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज सप्टेंबर १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात “मला माझा स्वतःचा धर्म आहे” असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्‍याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृ. १०-११ पाहावे.

२० मि:सेवा सभा व ईश्‍वरशासित सेवा प्रशाला या सभांचा फायदा करून घ्या. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित या पुरवणीतील पृष्ठ ५ वरील उपशीर्षकापासून ते पृष्ठ ६ वरील उपशीर्षकापर्यंत असलेल्या माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

१५ मि:शाखा दफ्तराचे पत्र. आमची राज्य सेवा याच्या याच अंकातील १ ल्या पृष्ठावरील पत्रावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

५ मि:स्थानीय घोषणा.

१५ मि:मागच्या वर्षी आपण केलेल्या कार्याचा आढावा. सेवा पर्यवेक्षकांनी मागील सेवा वर्षाच्या कार्याची उजळणी करावी व सेवाकार्यात साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. योग्य मुद्द्‌यांवर सर्वांची प्रशंसा करावी. येणाऱ्‍या वर्षभर लक्ष देण्याजोग्या एक किंवा दोन गोष्टींचा उल्लेख करावा. पायनियरांच्या कार्यावर टिप्पणी करावी व त्यांच्या उत्तम कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी. अक्रियाशील व्यक्‍तींना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कोणते चांगले परिणाम घडून आले याविषयी सांगावे.

२५ मि:“ऑक्टोबर १६ ते नोव्हेंबर १२ पर्यंत एक खास मोहीम!” उत्साहवर्धक चर्चा. हा भाग वडिलांनी हाताळावा. वडील वर्गांना पाठवलेल्या जून ६, २००६ तारखेच्या पत्रात दिलेली घोषणा वाचल्यानंतर, राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेची एक प्रत उपस्थितांपैकी प्रत्येकाला द्यावी. यानंतर सदर लेखाची प्रश्‍नोत्तर पद्धतीने चर्चा करावी. मंडळीचे क्षेत्र पूर्ण करण्याकरता कोणकोणत्या योजना आखण्यात आल्या आहेत हे सांगावे. सर्व प्रचारकांना या मोहिमेत पुरेपूर सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्यावे. ही पत्रिका कशी सादर करता येईल याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवावे.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ५ (४६)

१० मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. प्रचारकांना सप्टेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ १२ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज ऑक्टोबर १ अंक किंवा सावध राहा! ऑक्टोबर - डिसेंबर अंक रस्त्यावरील साक्षकार्य करताना कसा सादर करता येईल हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.

२५ मि:“गांभिर्याने लक्ष देण्याजोगा व्हिडिओ.”a १ ल्या परिच्छेदावर चर्चा करताना मंडळीतल्या सर्वांना तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) या व्हिडिओत आपल्याला विशेषतः काय आवडले हे सांगण्यास निवेदन करावे. यानंतर परिच्छेद २-७ यांत दिलेल्या प्रत्येक प्रश्‍नावर चर्चा करावी. शेवटी, सर्व कुटुंबांना येणाऱ्‍या काही दिवसांत, तरुण लोक विचारतात—मी जीवनात काय करू इच्छितो? (इंग्रजी) हा व्हिडिओ (डीव्हीडी) सर्व कुटुंब मिळून पाहण्याचे उत्तेजन द्या.

१० मि:स्थानीय अनुभव. सावध राहाचा! विशेषांक सादर करताना अथवा बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या साहाय्याने पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करताना आलेले अनुभव सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करावे. एक किंवा दोन उल्लेखनीय अनुभव प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवता येतील.

गीत क्र. २७ (२२१) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१० मि:स्थानीय घोषणा. प्रश्‍नपेटीची उजळणी.

१५ मि:स्थानीय गरजा.

२० मि:“घरोघर साक्ष देणे.”b उपलब्ध असलेल्या वेळात श्रोत्यांना लेखात उल्लेखलेल्या शास्त्रवचनांवर टिप्पणी करण्यास सांगावे.

गीत क्र. १५ (१२७) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा