वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. २
  • प्रश्‍नपेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍नपेटी
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९१
  • सर्वात महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला निपुण बनवणारी प्रशाला
    आमची राज्य सेवा—२००२
  • यहोवाने शिकविलेले
    आमची राज्य सेवा—१९९१
  • पुढाकार घेणारे ओव्हरसियर —थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल ओव्हरसियर
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. २

प्रश्‍नपेटी

▪ ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत वर्षभर सादर करण्यात येणार असलेले साहित्य संग्रहित करून ते इतरांना देणे योग्य आहे का?

स्वतःच्या वापराकरता किंवा मोजक्या जवळच्या मित्रांकरता अशाप्रकारचा संग्रह तयार करण्यात काही गैर नाही. परंतु, हे साहित्य बऱ्‍याच लोकांमध्ये वितरीत करणे किंवा पैशांच्या मोबदल्यात ते कोणाला देणे योग्य नाही. हे मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन ठरेल.—रोम. १३:१.

ईश्‍वरशारित सेवा प्रशालेत नेमलेल्या काही भागांकरता कोणतेही संदर्भ दिलेले नसतात, फक्‍त मुख्य विषय पुरवलेला असतो. अशावेळी, एखाद्याने त्या विषयावरील संदर्भांची यादी तयार करणे किंवा संदर्भ साहित्य गोळा करून हा भाग ज्याला नेमण्यात आला आहे त्याला ते देणे योग्य ठरेल का? नाही. तसेच, ईश्‍वरशासित सेवा प्रशालेच्या उजळणीतील प्रश्‍नांची उत्तरे संग्रहित करून दुसऱ्‍यांना देणेही योग्य नाही. कारण असे केल्यामुळे महत्त्वाचे मुद्दे त्या व्यक्‍तीच्या मनात ठसविले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी स्वतः संशोधन केले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे यहोवा देव आपल्याला सेवा प्रशालेच्या माध्यमाने ‘सुशिक्षितांच्या जिव्हेने’ बोलण्यास शिकवीत आहे.—यश. ५०:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा