वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २८ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ८/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑगस्ट १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१५ मि:स्थानीय घोषणा. “नव्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम” या भागाची चर्चा करा. पुढच्या खास संमेलन दिवसाची तारीख माहीत असल्यास तिची घोषणा करावी. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज ऑगस्ट १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात “यहोवाच्या साक्षीदारांकडून आम्हाला काहीही ऐकायचे नाही,” असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्‍याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृ. १७-१८ पाहावे.

१५ मि:“ऑक्टोबरमध्ये सादर केला जाईल सावध राहाचा! विशेषांक.”a ४ थ्या परिच्छेदाची चर्चा करताना एक किशोरवयीन प्रचारक आपल्या शिक्षकाला सावध राहाचा! ऑक्टोबर-डिसेंबर विशेषांक सादर करतानाचे दृश्‍य दाखवा.

१५ मि:मी वाचन का केले पाहिजे? सावध राहा! जुलै-सप्टेंबर २००६ अंकातील पृष्ठे २१-२३ वरील माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. श्रोत्यांपैकी जे ख्रिस्ती कुटुंबांत लहानाचे मोठे झाले आहेत, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना बायबलचे वाचन करण्याकरता व त्यातील तत्त्वांचे विशेषतः शालेय जीवनात पालन करण्याकरता कशाप्रकारे साहाय्य केले हे विचारावे. एक किंवा दोन प्रचारकांना याविषयी टिप्पणी करण्याकरता आधीपासूनच सूचना द्यावी.

गीत क्र. १९ (१६४) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि:स्थानीय घोषणा व आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम” या भागाची चर्चा करावी व पुढच्या विभागीय संमेलनाची तारीख माहीत असल्यास त्याची घोषणा करावी.

१५ मि:टेहळणी बुरूज अभ्यास व जाहीर सभा यांपासून फायदा मिळवणे. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित (इंग्रजी) पृष्ठ ५९ पासून पृष्ठ ६४ वरील उपशीर्षकापर्यंत दिलेल्या माहितीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

२० मि:सहायक पायनियर सेवा करण्याकरता आतापासूनच योजना करा. भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. नव्या सेवा वर्षात निदान एका महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याचे ध्येय ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्यावे. (१ करिंथ. ९:२६) काहीजण कदाचित खास मोहिमेचा एखादा महिना निवडतील किंवा ज्या महिन्यात एखादी सुटी किंवा जास्तीचे शनिवार-रविवार येतात असा एखादा महिना निवडतील. श्रोत्यांना विचारा: “पूर्वी कधी, सहायक पायनियर सेवा करण्याकरता काही अडचणींवर मात केल्याचे तुम्हाला आठवते का? सहायक पायनियर सेवा केल्याने कोणते आशीर्वाद मिळतात? तुम्हाला सहायक पायनियर सेवा करण्याची इच्छा असेल, पण आपल्याला ते जमेल की नाही अशी शंका असेल तर तुम्ही याविषयी प्रार्थना का केली पाहिजे? (प्रे. कृत्ये ४:२९; २ करिंथ. ४:७; याको. १:५) याविषयी आपल्या कुटुंबासोबत किंवा मंडळीतल्या इतरांसोबत, विशेषतः ज्यांची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे अशा व्यक्‍तींशी चर्चा केल्यास कोणता चांगला परिणाम घडून येईल? (नीति. १५:२२) तुम्ही केव्हा सहायक पायनियर सेवा करण्याचे ठरवले आहे?”

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. प्रचारकांना ऑगस्ट महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ ४ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज सप्टेंबर १ अंक किंवा सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक पुनर्भेटीत अथवा नियतकालिक मार्गावर असलेल्या व्यक्‍तीला भेट देताना कसा सादर करता येईल हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.

१५ मि:तुम्ही इतरांना प्रोत्साहन देऊ शकता. (रोम. १:११, १२) भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. मंडळीत किती सामान्य पायनियर आहेत ते सांगा. आपण त्यांची प्रशंसा करण्याद्वारे, पायनियर सेवेबद्दल सकारात्मकरित्या बोलण्याद्वारे, त्यांच्यासोबत सेवेत सहभागी होण्याद्वारे, त्यांना जेवायला निमंत्रित करण्याद्वारे किंवा प्रवासाचा खर्च उचलण्याकरता मदत करण्याद्वारे व अशा इतर मार्गांनी त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. पायनियरांना विचारा की त्यांना इतरांकडून कशाप्रकारे प्रोत्साहन मिळाले. मंडळीत सामान्य पायनियर नसल्यास, जे सहायक पायनियर सेवा करतात त्यांना आपण कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो याविषयी चर्चा करावी.

२० मि:सप्टेंबर महिन्यात एक बायबल अभ्यास सुरू करायचे ठरवा. भाषण व प्रात्यक्षिके. सप्टेंबर महिन्यात आपण बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या साहाय्याने पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ, हे पुस्तक घरमालकाला देताना आपण त्यातील एखाददोन परिच्छेदांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. स्थानिक क्षेत्राकरता उचित असणाऱ्‍या विषयांचा उपयोग करून दोन प्रात्यक्षिके दाखवावीत. प्रत्येक प्रात्यक्षिकात, चर्चा पुढे सुरू ठेवण्याकरता पुढच्या भेटीची काहीतरी निश्‍चित व्यवस्था कशी करता येईल हे दाखवावे.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि:स्थानीय घोषणा.

१५ मि:स्थानीय गरजा.

२० मि:“सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार करण्याद्वारे—व्यक्‍तिगत आस्था दाखवा.”b २ ऱ्‍या परिच्छेदाच्या शेवटी उल्लेख केलेल्या रोमकर १:१४ यावर चर्चा करताना सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठ २५५ यातील “बार्बेरियन” या शीर्षकाखालील पहिल्या परिच्छेदातील माहितीवर संक्षिप्त टिप्पणी करावी. ३ रा परिच्छेद विचारात घेतल्यानंतर सर्व लोकांकरता सुवार्ता या पुस्तिकेत पृष्ठ २ वर जी तीन पावले उचलण्यास सांगितले आहे त्यांची उजळणी करावी. स्थानिक क्षेत्रात दुसरी एखादी भाषा बोलणारे लोक भेटतात तेव्हा या पुस्तिकेचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा