सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार करण्याद्वारे—व्यक्तिगत आस्था दाखवा
१ एका दृष्टान्तात प्रेषित योहानाने एका देवदूताला आकाशात उडताना पाहिले. हा देवदूत ‘प्रत्येक राष्ट्र, वंश, [व] निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या’ लोकांना सार्वकालिक सुवार्ता घोषित करत होता. (प्रकटी. १४:६) आपणही सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार करण्याद्वारे त्या देवदूताचे अनुकरण करत आहोत का? कधीकधी नकळत आपण विशिष्ट लोकांबद्दल पूर्वग्रह बाळगून विचार करत असतो. आणि आपल्या मनोवृत्तीचा, आपण ज्याप्रकारे या लोकांना सुवार्ता सादर करतो त्यावर परिणाम पडतो. म्हणूनच, वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये प्रचार कार्य करताना आपण त्यांच्याविषयी मनःपूर्वक आस्था व्यक्त केली पाहिजे.
२ तुमच्या क्षेत्राचा विचार करा: तुमच्या क्षेत्रात इतर राज्यातले लोक राहतात का? किंवा अशा काही वस्त्या आहेत का, की जेथे परकीय भाषा बोलणारे लोक येऊन वसले आहेत? अशा लोकांना भेटण्याकरता, त्यांच्याशी बोलण्याकरता व त्यांची ओळख करून घेण्याकरता पुढाकार घ्या. त्यांच्या गरजा, विवंचना, आवडीनिवडी काय आहेत? त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल काळजी वाटते, त्यांच्या कोणत्या पूर्वधारणा आहेत? हे सर्व जाणून घेऊन त्यानुसार आपला राज्य संदेश त्यांना सादर करण्याचा प्रयत्न करा. (१ करिंथ. ९:१९-२३) प्रेषित पौलाप्रमाणेच, आपल्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना, मग ते परप्रांतीय असोत, वेगळ्या संस्कृतीचे असोत, परकी भाषा बोलणारे असोत अथवा खूप श्रीमंत असोत त्या सर्वांना सुवार्ता सांगण्याचे आपले कर्तव्य आहे असे आपण मानले पाहिजे.—रोम. १:१४.
३ पण जे दुसरी भाषा बोलतात त्यांना तुम्ही साक्ष कशी देऊ शकता? सर्व राष्ट्रांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा चांगल्याप्रकारे उपयोग करा. तसेच तुमच्या क्षेत्रात सहसा ज्या ज्या भाषा बोलणारे लोक भेटतात त्या त्या भाषांतून काही पत्रिका व माहितीपत्रके अवश्य जवळ असू द्या. (आमची राज्य सेवा जुलै २००३ अंकातील पृ. ८ वर परि. २-३ पाहावेत.) शिवाय काही प्रचारकांनी इतर भाषांतून घरमालकाला नमस्कार करून सोप्या भाषेत अगदी लहानसा संदेश कसा द्यायचा हे शिकून घेतले आहे. सहसा इतर भाषिकांना आपल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करताना पाहून लोक प्रभावित होतात आणि जरी तुम्ही तोडक्या मोडक्या भाषेत बोलला तरीसुद्धा यामुळे ते सुवार्ता ऐकण्यास प्रवृत्त होऊ शकतात.
४ यहोवाचे अनुकरण करा: सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपण यहोवाचे, अर्थात आपल्या निःपक्षपाती देवाचे अनुकरण करत असतो. “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.”—१ तीम. २:३, ४.