ऑक्टोबरमध्ये सादर केला जाईल सावध राहाचा! विशेषांक
१ पक्ष्यांचे मंजूळ गाणे ऐकून, किंवा नयनरम्य सूर्यास्त पाहून जो सुखावत नाही असा माणूस विरळाच असेल. पण या सगळ्या गोष्टी एका प्रेमळ स्वर्गीय पित्याने निर्माण केल्या आहेत हे मात्र बहुतेक लोक कबूल करायला तयार नाहीत. पण, यहोवा देवच या सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे याविषयी साक्ष देण्याची एक विशेष संधी आपल्याला सावध राहाचा! विशेषांक सादर करण्याच्या निमित्ताने लवकरच मिळणार आहे. (यश. ४०:२८; ४३:१०) सावध राहाचा! ऑक्टोबर-डिसेंबर हा अंक, “सृष्टिकर्ता आहे का?” या विषयाला सर्वस्वी समर्पित आहे.
२ तुमच्या सेवेच्या क्षेत्रात: शक्य असल्यास मंडळीसोबत दर शनिवारी घरोघरच्या सेवाकार्यात सहभाग घेण्याची योजना आखा. अर्थात आठवड्यादरम्यान इतर वेळीही तुम्ही हा विशेषांक देऊ शकता. विशेषतः शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे इतर अधिकारी हा अंक घेण्यास उत्सुक असतील. तेव्हा तुमच्या क्षेत्रात अशा व्यक्तींना भेटण्याचा खास प्रयत्न करावा.
३ एखाद्या व्यक्तीने आवड दाखवल्यास, तिचा निरोप घेण्याआधी एखादा प्रश्न उपस्थित करा, ज्याचे उत्तर तुम्ही पुढच्या भेटीत द्याल. उदाहरणार्थ तुम्ही असा प्रश्न विचारू शकता, की जर एक प्रेमळ सृष्टिकर्ता आहे तर मग त्याने जगात इतकी दुःखद परिस्थिती का राहू दिली? मग पुढच्या भेटीत तुम्ही बायबल काय शिकवते पुस्तकातील १ ल्या किंवा ११ व्या अध्यायातून या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. किंवा निर्माणकर्त्याचा पृथ्वीसंबंधी काय उद्देश आहे असा प्रश्न विचारून, पुढच्या भेटीत ३ ऱ्या अध्यायातून तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता.
४ शाळेत: तुम्ही शालेय विद्यार्थी आहात का? मग तुम्ही सावध राहाचा! हा अंक तुमच्या शिक्षकांना व वर्गसोबत्यांना भेट म्हणून देऊ शकता. किंवा तुम्ही फक्त हा अंक तुमच्या टेबलावर ठेवला तरीही बरेच जण तुमच्या विश्वासांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे. वर्गांत होणाऱ्या चर्चांमध्ये किंवा निबंध इत्यादी लिहितानाही आपल्या विश्वासांचे समर्थन करण्याकरता या विशेषांकातील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. या बाबतीत तुम्हाला मदत करण्यासाठीच सदर अंकातील “तरुण लोक विचारतात” या सदरात “निर्मितीवरील माझ्या विश्वासाचे मी समर्थन कसे करू शकतो?” हा प्रश्न हाताळला आहे.
५ यहोवाने सर्व काही निर्माण केले असल्यामुळे त्याबद्दल त्याचे गौरव व सन्मान करणे योग्यच आहे. (प्रकटी. ४:११) सावध राहाच्या! ऑक्टोबर-डिसेंबर विशेषांकाचे आवेशाने वाटप करण्याद्वारे आपण स्वतः आपल्या सृष्टिकर्त्याचे गौरव करू शकतो आणि इतरांनाही असे करण्यास साहाय्य करू शकतो.