मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज मे १
“गरीब लोकांबद्दल आपला कोणता दृष्टिकोन असला पाहिजे? [उत्तरासाठी थांबा. मग मत्तय ९:३६ वाचा. त्यानंतर पृष्ठ ४ वरील लेख काढा.] येशूचा त्याच्या दिवसांतील गरीब लोकांबद्दल कसा दृष्टिकोन होता आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो, हे या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“आजपासून २० किंवा ३० वर्षांनी हे जग कसे असेल, असा कधी तुमच्या मनात प्रश्न आला आहे का? [उत्तर ऐका. मग स्तोत्र ११९:१०५ वाचा.] बायबल आपल्या मार्गावर प्रकाश टाकत असल्यामुळे भवितव्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे हे आपण आपल्या मनचक्षूंनी पाहू शकतो. या मासिकात भविष्यवाणींचे परीक्षण करण्यात आले आहे; या भविष्यवाण्या, काळाच्या ओघात आज आपण कोठे आहोत आणि आपण उज्ज्वल भवितव्याची अपेक्षा का करू शकतो, हे दाखवतात.”
टेहळणी बुरूज जून १
“पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे, की देव या जगात बदल करणार आहे. त्यासाठी आपण स्वतःला कसे तयार करू शकतो? [उत्तरासाठी थांबा. मग, २ पेत्र ३:११-१३ वाचा आणि पृष्ठ ९ वरील लेख काढा.] पृथ्वीवरील रहिवाशांचा देव न्याय करील तेव्हा आपण स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी कोणती तयारी करू शकतो, हे या लेखात सांगितले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“रसातळाला जात असलेल्या जगाच्या अवस्थेचा मानवजातीसाठी काय अर्थ होतो? [उत्तर ऐकून घ्या. मग २ तीमथ्य ३:१-५ वाचा.] मानवजातीसाठी भवितव्यात काय राखून ठेवले आहे, हे या मासिकात सांगितले आहे.” पृष्ठ ९ उघडा आणि “पुढची वाट” या पोटमथळ्याखालील माहिती दाखवा.