“मुक्तिसमय जवळ आला आहे!” प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात करण्याकरता विश्वव्यापी मोहीम
प्रत्येक मंडळीतील प्रचारकांनी या खास पत्रिकेच्या वाटप मोहीमेत भाग घेतला पाहिजे
१ उत्तर गोलार्धात, २००६ सालच्या वसंतऋतूपासून संपूर्ण जगभरात प्रांतीय अधिवेशनांची मालिका संपेपर्यंत, सुमारे १५५ देशांत होणाऱ्या प्रांतीय अधिवेशनांची जाहिरात करण्याकरता एक विश्वव्यापी मोहीम काढली जाईल. या मोहिमेत, जर्मनी, चेक प्रजासत्ताक आणि पोलंड येथे २००६ सालच्या जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत होणाऱ्या खास अधिवेशनांचाही समावेश असेल.
२ आपण शेवटल्या काळाच्या शेवटल्या घटकेत राहत असल्यामुळे या दुष्ट व्यवस्थीकरणापासून मुक्तता देण्याच्या देवाने दिलेल्या वचनावर जोर देणाऱ्या अधिवेशनांचा योग्य लोकांवर जबरदस्त प्रभाव पडला पाहिजे. भविष्यात काय होणार आहे यावर गांभीर्याने विचार करण्यास अधिवेशनातील संदेशाने त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. सांत्वन व आशेचा संदेश ऐकण्याची संधी कोट्यवधी लोकांना मिळावी म्हणून यहोवाच्या साक्षीदारांच्या ९८,००० पेक्षा अधिक मंडळ्यांना, आमंत्रण देण्यात आलेल्या अधिवेशनाच्या जाहिरात मोहीमेत हिरिरीने भाग घेण्यास आर्जवले जात आहे.
३ प्रत्येक प्रचारकाला ३० हस्तपत्रिका मिळतील इतका हस्तपत्रिकांचा पुरेसा साठा मंडळ्यांना पाठवला जाईल. ज्यादा हस्तपत्रिका मंडळीतील पायनियर वापरू शकतात. प्रत्येक मंडळीला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे त्या अधिवेशनाच्या तीन आठवड्यांआधी ही मोहीम सुरू होईल. यामुळे मंडळीचे जितके क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्रात, हस्तपत्रिकेचे वाटप करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
४ असे सुचवले जाते, की शक्य असेल तेथे प्रत्येक घरमालकाला एक हस्तपत्रिका दिली जावी. परंतु, जर घराला कुलूप असेल तर, सावधगिरी बाळगून दाराजवळ कुठेतरी ती सरकवता येईल. तीन आठवड्यांच्या कालावधीत सर्व हस्तपत्रिकांचे वाटप करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात यावा.
५ या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, “मुक्तिसमय जवळ आला आहे!” या प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात करण्यासाठी विश्वभरात केल्या जाणाऱ्या विश्वव्यापी एकजूट प्रयत्नामुळे खूप मोठ्या प्रमाणावर साक्ष दिली जाईल, अशी आम्हाला खात्री वाटते. या विश्वव्यापी मोहिमेत भाग घेण्यासाठी तुम्ही व्यक्तिगतरीत्या जे प्रयत्न कराल त्यावर यहोवाचे समृद्ध आशीर्वाद राहोत अशी आम्ही प्रार्थना करतो.