वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०६ पृ. ४-५
  • यहोवाची वाट पाहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची वाट पाहा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना
  • आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेण्याची एक आनंददायक संधी
    आमची राज्य सेवा—२००८
  • आदरयुक्‍त वर्तनाद्वारे ख्रिस्ताचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—२००७
  • मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • प्रांतीय अधिवेशने —आनंदाने उपासना करण्याचा समय
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ४/०६ पृ. ४-५

यहोवाची वाट पाहा

१. या वर्षाच्या अधिवेशनाचा विषय काय आहे, आणि हे उचित का आहे?

१ यहोवा “परमेश्‍वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य,” असे यशयाने लिहिले. (यश. ३०:१८ब) देवाने त्याच्या शत्रूंवर न्यायदंड बजावून आपल्या विश्‍वासू सेवकांची सुटका केल्याचे पुष्कळ अहवाल बायबलमध्ये आहेत. हे अहवाल, यहोवाच्या उपासकांना आज कोणता धडा शिकवतात? ‘परमेश्‍वराच्या महान व भयंकर दिवसाची’ तयारी करण्याकरता आज आपण काय करू शकतो? (योए. २:३१, ३२) “मुक्‍तिसमय जवळ आला आहे!” हे आपले आगामी प्रांतीय अधिवेशन आपल्याला या प्रश्‍नांवर मनन करण्यास व आत्म-परीक्षण करण्यास प्रवृत्त करेल. यहोवाची वाट पाहत राहण्यास ते आपल्याला मदत करेल.

२. आपल्या प्रांतीय अधिवेशनाबद्दल आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो?

२ अधिवेशनाच्या तिन्ही दिवसांचा लाभ घेता यावा म्हणून तुम्ही योजना केल्या आहेत का? उदाहरणार्थ, अधिवेशनाला हजर राहात यावे म्हणून तुम्ही तुमच्या मालकाकडे रजा मागितली आहे का? शेवटच्या मिनिटांपर्यंत थांबून राहा नका. या विषयी प्रार्थना करा. मग, मालकाला याबाबतीत विनंती करा. (नहे. २:४, ५) तसेच, अधिवेशनाला जाण्या-येण्याची, राहण्याची आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींची योजना देखील आपण शेवटल्या मिनिटासाठी सोडू नये. चांगल्याप्रकारे योजना करण्यावरून तुम्हाला यहोवाच्या आध्यात्मिक मेजवानीबद्दल गहिरी कृतज्ञता आहे हे दिसून येईल. गरज असलेल्यांना, विशेषकरून मंडळीतील वृद्ध जनांना अधिवेशनाच्या बाबतीत काही साहाय्य हवे आहे का याबाबतीत वडिलांनी जागृत राहावे.—गलती. ६:१०.

३. अधिवेशन चालणाऱ्‍या शहरात यहोवाच्या लोकांनी कोणते गुण दाखवले पाहिजेत?

३ उत्तम आचरण देवाचा आदर करते: अधिवेशनांमध्ये आपण मोठ्या संख्येने जमा होतो तेव्हा आपले उत्तम आचरण इतर लोकांना एक साक्ष देते. त्यामुळे, आपल्यावतीने आपण काय केले पाहिजे? अधिवेशन होणाऱ्‍या क्षेत्रातील हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा दुकानांमध्ये असताना, आपण ज्यांच्याबरोबर व्यवहार करतो त्यांना सहनशीलता, सौम्यता, इंद्रियदमन अर्थात आत्मसंयम व समंजसपणा यांसारखे आपले ख्रिस्ती गुण आपल्या वागण्या-बोलण्यातून दिसले पाहिजेत आणि आपला सहवास त्यांना सुखद वाटला पाहिजे. (गलती. ५:२२, २३; फिलिप्पै. ४:५) आपण सर्वांना अशी प्रीती दाखवली पाहिजे जी “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” आपल्यासमोर अडचणी येतात किंवा आपली गैरसोय होत असते तेव्हा देखील आपण “सर्व देवाच्या गौरवासाठी” केले पाहिजे.—१ करिंथ. १०:३१; १३:५.

४. पालक आपल्या मुलांना, यहोवाची स्तुती होईल अशाप्रकारे वागण्यास कशी मदत करू शकतात?

४ एका अधिवेशनानंतर, आपल्या तरुणांचे वर्तन व पेहराव पाहून एका हॉटेलचा मॅनेजर इतका प्रभावीत झाला की त्याने, “माझ्या हॉटेलमध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी नेहमी यावे,” अशी आपली इच्छा व्यक्‍त केली. किती आनंदाची ही गोष्ट! आपल्या मुलांना उत्तम प्रशिक्षण दिल्याबद्दल व आपल्या मुलांवर देखरेख ठेवल्याबद्दल, तुम्हा पालकांचे अभिनंदन! हॉटेलच्या खोलीत पालकांनी मुलांना एकटे सोडू नये. मुलांवर उचित प्रकारची देखरेख ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (नीति. २९:१५) मुलांच्या उत्तम आचरणाने यहोवाची स्तुती होवो व त्याचे मन आनंदित होवो!—नीति. २७:११.

५. आपला पेहराव आणि केशभूषा यावरून आपण यहोवाचा आदर कसा करू शकतो?

५ शालीन पेहराव व केशभूषा: अतिशय फॅशनेबल, भपकेबाज, असभ्य किंवा अगदीच गबाळा पेहराव व केशभूषा टाळण्याद्वारे आपल्यातील प्रत्येकजण अधिवेशनाची उत्तम छाप पाडण्यास हातभार लावू शकतो. हे तत्त्व, अधिवेशन होणाऱ्‍या शहरात येता-जाता, अधिवेशन होणाऱ्‍या ठिकाणाची साफ-सफाई करताना व अधिवेशनाला उपस्थित राहताना लागू होते. देवाचे सेवक यानात्याने आपण व्यक्‍तिगत आवडी-निवडी किंवा आरामाची चिंता करण्यापेक्षा यहोवाच्या नावाची व लौकिकाची चिंता केली पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या पेहरावावरून सर्व वेळी शालीनता व विचारशीलता दिसून येते याची खात्री करण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखांवर येते.—१ तीम. २:९.

६. अधिवेशनानंतरच्या फावल्या वेळांत देखील आपण अधिवेशन कार्यक्रमांच्या वेळी घातलेले कपडे परिधान करणे उचित का आहे?

६ तसेच, हॉटेलमध्ये, दुकानांत, रेस्टॉरंटमध्ये असताना देखील आपला पेहराव आदरणीय असला पाहिजे. अधिवेशनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण जर बाहेर खाणार असू तर, अधिवेशनाला घातलेले कपडे परिधान करणे उचित असेल. अधिवेशन बॅज लावल्यामुळे साक्ष देण्यासाठी संधी निर्माण होते.—२ करिंथ. ६:३, ४.

७. अधिवेशनाचा सुव्यवस्थितपणा आणि आनंद याला आपण हातभार कसा लावू शकतो? (“प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना” पाहा)

७ यशयाने भाकीत केले: “तुम्हांवर कृपा करावी म्हणून यहोवा वाट पाहील, आणि तुम्हांवर दया करावी म्हणून तो उंचावला जाईल.” (यश. ३०:१८अ, पं.र.भा.) यहोवाची दया आणि अपात्र कृपा यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने आपल्याला, आपण जेव्हा अधिवेशनांसाठी एकत्र येतो तेव्हा आपले वर्तन आणि आपला पेहराव यांद्वारे त्याचा आदर करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. “मुक्‍तिसमय जवळ आला आहे!” प्रांतीय अधिवेशन आपल्या देवाचे गौरव करो आणि त्याची वाट पाहण्यास आपल्याला मदत करो!

[५ पानांवरील चौकट]

प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना

▪ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. कार्यक्रम सुरू व्हायच्या काही मिनिटे आधी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर येऊन बसतील, सुरुवातीचे राज्य संगीत तेव्हा चालू झालेले असेल. सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी ५:१५ वाजता आणि शनिवारी ५:०५ वाजता तसेच रविवारी ४:१० वाजता संपेल.

▪ पार्किंग: अधिवेशन होणाऱ्‍या सर्व ठिकाणी, पार्किंगची सोय असेल; गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. अधिवेशनाचा बॅज कार्ड पार्किंगसाठी ओळखपत्र असेल. पार्किंगची जागा सहसा मर्यादित असते त्यामुळे, ज्या बंधूभगिनींकडे स्वतःच्या कार आहेत ते कारपूलिंग करू शकतात. म्हणजे, फक्‍त एकाने किंवा दोघांनी स्वतःच्या कारने येण्याऐवजी, ज्या इतर बंधूभगिनींकडे देखील कार आहेत अशांना आपल्या कारमध्ये येण्यास सांगू शकतात. यामुळे कार पार्किंगची समस्या कमी होऊ शकेल.

▪ आसने राखणे: एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्‍यांसाठीच केवळ आसने राखून ठेवली जावीत.

▪ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशन स्थळ सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत हलके जेवण आणा. तुमच्या आसनाखाली बसेल अशा एखाद्या लहान पिशवीत डबा आणावा. मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्‍या मोठ्या वस्तू क्लोकरूममध्ये ठेवाव्यात.

▪ देणग्या: प्रांतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात बऱ्‍यापैकी खर्च होतो. आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशनात जगभरात चाललेल्या कार्यासाठी असलेल्या देणग्यांच्या पेट्यांमध्ये आपण देणग्या टाकून आपली कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “वॉच टावरला” देय केले पाहिजे.

▪ अपघात आणि तातडीचे प्रसंग: अधिवेशनाच्या ठिकाणी तातडीची परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंन्डेंटला कळवावे. तो लगेच प्राथमिक उपचार विभागाशी संपर्क साधेल आणि आपल्यापैकी प्रशिक्षित वैद्यकीय बंधू अथवा भगिनी परिस्थिती किती गंभीर आहे हे अजमावून पाहतील आणि त्यानुसार मदत देतील.

▪ कर्णबधिर: सिकंदराबाद येथे इंग्रजीत होणाऱ्‍या अधिवेशनात संकेत भाषा कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे.

▪ रेकॉर्डिंग: अधिवेशनाच्या साऊण्ड सिस्टमला किंवा वीज उपकरणांना कोणत्याही प्रकारचे रेकॉडर्स जोडू नयेत. तसेच इतरांचे लक्ष विचलित होणार नाही अशाप्रकारे त्यांचा उपयोग करावा.

▪ फोटो: कार्यक्रमांदरम्यान तुम्ही जर फोटो घेणार असाल तर कृपया फ्लॅशचा उपयोग करू नका.

▪ पेजर आणि सेल फोन: इतरांचे लक्ष विचलित होणार नाही अशाप्रकारे ते सेट करावेत.

▪ अत्तरे: काही अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. यास्तव, आपण खूपच उग्र अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून इतरांप्रती दया दाखवतो; ज्यांना श्‍वसनाचे व श्‍वसनसंबंधित इतर विकार आहेत त्यांना उग्र स्वरूपाच्या वासांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे.—१ करिंथ. १०:२४.

▪ पुनःभेट द्या फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्‍तीविषयीची माहिती देण्याकरता कृपया पुनःभेट द्या (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन पुनःभेट द्या फॉर्म्स सोबत आणावेत. अधिवेशनात बुकरूम विभागातही हे फॉर्म उपलब्ध असतील. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर बुकरूमला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५, पृ. ६ पाहा.

▪ रेस्टॉरंट: अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्‍या सेवेसाठी १५ ते २० टक्के टिप्स देण्याची प्रथा आहे.

▪ हॉटेल्स: (१) तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत त्याच्यापेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्याच्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका. (२) तुम्हाला जर तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर कृपया हॉटेलला लवकरात लवकर कळवा. (३) तुम्हाला लागेल तेव्हा लगेज कार्ट घ्या. (४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (५) प्रत्येक दिवशी हॉऊसकीपरला बक्षीस द्या. (६) आपण ख्रिस्ती असल्यामुळे, हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता मोफत पुरवल्या जाणाऱ्‍या गोष्टी, जसे की नाश्‍ता, कॉफी किंवा थंड पदार्थांचा गैरफायदा घेऊ नका. (७) हॉटेलच्या कर्मचाऱ्‍यांशी वागताना, खासकरून चेक-इन व चेक-आऊट करण्याच्या घाईगडबडीच्या वेळांमध्ये, आत्म्याचे फळ प्रदर्शित करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा