आवेश कसा टिकवायचा?
१ अपुल्लोने ज्या आवेशाने सेवा केली त्यावरून आपल्याला, आज प्रचार कार्यात अगदी जोमाने कार्य करणाऱ्या सहख्रिश्चनांची आठवण होईल. (प्रे. कृत्ये १८:२४-२८) पण आपल्या सर्वांनाच असा सल्ला दिला जातो: “आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा.” (रोम. १२:११) कोणती गोष्ट आपल्यात ख्रिस्ती सेवेसाठी आवेश निर्माण करून तो टिकवून ठेवण्यास मदत करेल?
२ ज्ञानामुळे आवेश वाढतो: येशू आपल्या दोन शिष्यांसमोर प्रकट झाल्यानंतर व ‘संपूर्ण शास्त्रांतील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितल्यानंतर’ त्यांनी म्हटले: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता . . . तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” (लूक २४:२७, ३२) याचप्रमाणे, देवाच्या वचनाची अधिक समज आपल्याला मिळते तेव्हा आपल्याही अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नाही का? होय, ज्ञानामुळे विश्वास वाढतो. रोमकर १०:१७ म्हणते: “विश्वास वार्तेने” होतो. आपण पूर्ण अंतःकरणाने यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवतो तेव्हा, शिकलेल्या गोष्टींविषयी इतरांना सांगितल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही!—स्तो. १४५:७; प्रे. कृत्ये ४:२०.
३ पण, सुरुवातीला आपण अभ्यास करून मिळवलेले ज्ञान आपल्या मनात, देवाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या सेवेबद्दलचा आवेश कायम टिकवून ठेवेल म्हणून आपण निर्धास्त राहू शकत नाही. तर, सत्याबद्दल आपल्याला असलेल्या ज्ञानात आपण आणखी भर टाकत राहिले पाहिजे आणि यहोवाबद्दलचे प्रेम आणखी गहिरे बनवले पाहिजे. नाहीतर, आपण त्याची सेवा यांत्रिकपणे करत राहू. (प्रकटी. २:४) देवाचे वचन आपल्याला, “देवाच्या पूर्ण ज्ञानाने . . . वृद्धि” करण्याचे उत्तेजन देते.—कलस्सै. १:९, १०.
४ आपल्या अभ्यासाच्या सवयी: यास्तव आपण आपल्या अभ्यासाच्या सवयींचे परीक्षण केले पाहिजे. जसे की, आपण कदाचित टेहळणी बुरूज मधील अभ्यास लेखात उत्तरे अधोरेखीत करून बरोबर उत्तरे देऊ. पण, लेखात दिलेली शास्त्रवचने उघडून, ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी लागू होतात यावर आपण मनन करतो का? साप्ताहिक बायबल वाचनाच्या वेळी, आपली परिस्थिती अनुमती देत असेल तर आपण आणखी संशोधन करून वचनांमध्ये असलेल्या व्यवहारोपयोगी मुद्द्यांवर मनन करतो का? (स्तो. ७७:११, १२; नीति. २:१-५) देवाच्या वचनावर मनन करून त्यात गढून जाणे खरोखरच किती लाभदायक आहे! (१ तीम. ४:१५, १६) अशाप्रकारचा अर्थपूर्ण अभ्यास आपल्या हृदयाचे पोषण करील आणि “चांगल्या कामात तत्पर” होण्यासाठी आपल्याला शक्ती देईल.—तीत २:१४.