वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०६ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ३/०६ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज मार्च १

मनोरंजन खरोखरच आनंददायक ठरावे म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो? [उत्तर ऐकून घ्या, मग उपदेशक ३:१२, १३ वाचा व पृष्ठ २२ वरील लेख उघडून दाखवा.] मनोरंजनाच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याकरता या लेखात अतिशय उपयुक्‍त सूचना दिल्या आहेत.”

सावध राहा! जाने.-मार्च

“नैसर्गिक विपत्तींमुळे लोकांना जे दुःख सहन करावे लागते ते पाहवत नाही. [तुमच्या परिसरात लोकांना माहीत असलेले एखादे उदाहरण सांगा.] अशा प्रकारच्या विपत्ती वाढत चालल्या आहेत असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात याच विषयावर चर्चा केली आहे. तसेच अशा विपत्तींमुळे ज्यांना आपल्या प्रिय माणसांना गमवावे लागले आहे त्यांचे यात सांत्वन करण्यात आले आहे.” योहान ५:२८, २९ वाचा.

टेहळणी बुरूज एप्रि. १

“निर्णय घेणे सोपे नाही. शिवाय गुंतागुंतीच्या परिस्थितीत, व अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो तेव्हा निर्णय घेणे आणखीनच कठीण होऊन जाते. कोणती गोष्ट आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते? [उत्तर ऐकून घ्या व मग यशया ३०:२१ वाचा. पृष्ठ ७ वरील लेख उघडून दाखवा.] शास्त्रवचनांचे ज्ञान आपल्याला योग्य निर्णय घेण्यास कशी मदत करू शकते याविषयी या लेखात स्पष्ट केले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“आजपासून २० किंवा ३० वर्षांनंतर या जगाची काय स्थिती असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या व मग स्तोत्र ११९:१०५ वाचा.] बायबल आपल्या भविष्यावर प्रकाश टाकते जेणेकरून पुढे काय घडणार आहे हे आपण ओळखू शकतो. हे मासिक भविष्यवाण्यांचे परीक्षण करून, आपण आज काळाच्या ओघात कोठे उभे आहोत आणि आपण एका उज्ज्वल भविष्याची अपेक्षा का करू शकतो याविषयी खुलासा करते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा