वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. २
  • “आत्म्यात उत्सुक असा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आत्म्यात उत्सुक असा”
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • सेवेतला आवेश आपण टिकवून ठेवला पाहिजे
    आमची राज्य सेवा—२००७
  • या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवाल का?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा इश्‍वरी आवेशाला आशीर्वादित करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. २

“आत्म्यात उत्सुक असा”

१. आपले प्रचार कार्य कसे असले पाहिजे?

१ ख्रिस्ती सेवेतील कोणत्याच पैलूत आपण अक्रियाशील असू नये. उलट “आत्म्यात उत्सुक असा; प्रभुची सेवा करा” असे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे. (रोम. १२:११) पण अनेक गोष्टी सेवेतील आपला उत्साह कमी करू शकतात. राज्य सेवेबद्दल आपण आपला आवेश व उत्साह कशा प्रकारे “प्रज्वलित” ठेवू शकतो?—२ तीम. १:६, ७.

२. वैयक्‍तिक बायबल अभ्यास व आवेशी प्रचारकार्य यांचा परस्परांशी काय संबंध आहे?

२ वैयक्‍तिक बायबल अभ्यास: एक प्रभावी राज्य प्रचारक तोच असतो ज्याला देवाचे नियम प्रिय असतात व त्यातील सत्य त्याच्या अंतःकरणाला भिडलेले असते. (स्तो. ११९:९७) वैयक्‍तिक बायबल अभ्यास करताना आपल्याला जेव्हा बायबलमधून एक-एक मौल्यवान गोष्ट समजत राहते तेव्हा आपले हृदय कार्य करण्यास प्रवृत्त होते व आपला आवेश वाढतो. ज्याने हे सत्य दिले आहे त्याच्याबद्दलच्या प्रेमापोटी व इतरांना सुवार्ता सांगण्याच्या आपल्या इच्छेमुळे आपण देवाचे गौरव करण्यास व त्याचे नाव जाहीर रित्या सांगण्यास प्रवृत्त होतो. (इब्री १३:१५) खरेतर आपण लोकांना अगदी कळकळीने सुवार्ता सांगण्यासाठी झटतो तेव्हा त्या सुवार्तेचे मोल जाणत असल्याचे आपण दाखवतो.

३. देवाचा आत्मा आपल्या सेवा कार्यावर कसा प्रभाव करू शकतो?

३ देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा: आपण आपल्या ताकतीवर प्रचार कार्यात यशस्वी होऊ शकत नाही! देवाच्या आत्म्याच्या सतत प्रभावामुळेच खरा आवेश निर्माण होतो. (१ पेत्र ४:११) “महासमर्थ” असलेल्या यहोवा देवाच्या सान्‍निध्यात आपण गेलो तर साक्ष देण्यासाठी आध्यात्मिक बळ तो आपल्याला देईल. (यश. ४०:२६, २९-३१) प्रेषित पौलाला सेवा कार्य करताना संकटांचा सामना करावा लागला तेव्हा त्याने “देवापासून साहाय्य प्राप्त” केले. (प्रे. कृत्ये २६:२१, २२) यहोवाचा शक्‍तिशाली पवित्र आत्मा आपल्याला आपल्या सेवेत उत्सुक राहण्यास मदत करू शकतो त्यामुळे आपण तो मिळावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे.—लूक ११:९-१३.

४. आवेशामुळे कोणते चांगले परिणाम मिळू शकतात व त्यासोबतच कोणती दक्षता बाळगली पाहिजे?

४ राज्याच्या प्रचारासाठी आपल्याला असलेला तीव्र आवेश पाहून आपल्या सह ख्रिस्ती बांधवामध्येही सहसा अशाच प्रकारचा आवेश निर्माण होऊ शकतो. (२ करिंथ. ९:२) क्षेत्रात आवेशाने व ठामपणे सांगितल्या जाणाऱ्‍या संदेशाला लोक चांगला प्रतिसाद देतात. पण आवेशासोबत व्यवहारकुशलता, समंजसपणा व सौम्यपणा असणे गरजेचे आहे. (तीत ३:२) आपण नेहमी घरमालकाचा व निवड करण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे.

५. आपण कोणत्या प्रेरित सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

५ राज्य प्रचारक यानात्याने आपण नेहमीच “आत्म्यात उत्सुक” राहू या. वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्याद्वारे व शक्‍तिशाली पवित्र आत्मा पुरवू शकणाऱ्‍या यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे आपण आवेशी राहू या. अशा रितीने आपण आपली सेवा आवेशाने, “पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने” करू शकू.—१ थेस्सलनी. १:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा