सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा
हे का महत्त्वाचं: शिष्य बनवण्याच्या कामात आपण वापरत असलेल्या साधनांपैकी बायबल काय शिकवते हे एक साधन आहे ज्याचा आपण प्रामुख्यानं उपयोग करतो. पण या पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याआधी आपण ते घरमालकाला दिलं पाहिजे. त्यासाठी, आपण सर्वांनी सेवेमध्ये ते कुशलपणे सादर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २२:२९, सुबोधभाषांतर.) हे पुस्तक सादर करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रचारक त्यांना सोप्या वाटणाऱ्या मार्गानं ते सादर करू शकतात. बहुतेक वेळा आपण बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचा उपयोग करतो आणि अभ्यास एकदा सुरळीत होऊ लागला, की मग बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास सुरू करतो. इतर वेळेला, घरमालकाला खूपच आवड असेल तर प्रचारक थेट बायबल काय शिकवते पुस्तकातूनच अभ्यास सुरू करतील.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
आपल्या कौटुंबिक उपासनेत वर सुचवलेल्या मार्गांचा सराव करा.
सेवेत गेल्यावर, तुमच्या सोबत असलेल्या प्रचारकाला तुम्ही काय म्हणणार आहात ते सांगा. (नीति. २७:१७) तुमची सादरता प्रभावी ठरली नसेल तर दुसरी वापरा.